विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण ही आमची श्रध्दा आहे. त्यामुळे धनुष्यबाण आम्हालाच मिळाला पाहिजे. जर आम्हाला दिला नाही तर हे चिन्ह गाेठवा अशी मागणी करताना शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे भावुक झाले. Chandrakant Khaire
शिवसेना पक्ष आणि त्याचे पारंपरिक धनुष्यबाण हे चिन्ह कोणाकडे राहणार यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. 2022 मध्ये झालेल्या थेट फुटी नंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या या संघर्षाचा आता निर्णायक टप्पा आला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले की, धनुष्यबाण हे चिन्ह मूळ शिवसेनेलाच, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाच द्यावे, अन्यथा ते गोठवावे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे मूळ चिन्ह आणि वारसा आमचाच आहे. सत्ता गेली तरी वारसा आमच्याकडे आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला. त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांनी नारळ फोडला आणि नाव दिले. 1968 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह आमचे होते. त्यानंतर पक्ष वाढत गेला. मी स्वतः 1988 मध्ये संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावरच निवडून आलो आणि त्यानंतर बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. खैरे पुढे म्हणाले की, इलेक्शन कमिशनने कोणत्या निकषावर हे चिन्ह शिंदे गटाला दिलं, हेच समजत नाही. त्यांनी शिवसेना फोडली, आणि त्यांच्याकडेच पक्ष व चिन्ह गेले, हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचेही खैरे यांनी म्हटले आहे.
खैरे यांनी निवडणुकीच्या संदर्भात सांगितलं की, लोकसभेच्या निवडणुकीत माझ्या मतांपैकी एक लाख मते केवळ धनुष्यबाणाच्या चिन्हामुळे दुसऱ्या गटाकडे गेली. अनेक मतदारांना वाटले त्यांनी मला मतदान केले, पण प्रत्यक्षात चिन्हामुळे ते गोंधळात पडले. निवडणूक आयोगाने आधी मशाल चिन्ह दिले, मग अचानक म्हटले अशी मशाल अस्तित्वात नाही. या गोंधळामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे आम्हाला मोठे नुकसान झाले. त्यांनी भावनिक सुरात सांगितले की, धनुष्यबाण आमच्यासाठी केवळ चिन्ह नाही, ती आमची श्रद्धा आहे. मातोश्रीवर आजही त्या धनुष्यबाणाची पूजा केली जाते. त्यामुळे आम्हालाच ते चिन्ह मिळालं पाहिजे.
खैरे म्हणाले की, मी देवाकडे आणि न्यायालयाकडे प्रार्थना करतो, आमचा धनुष्यबाण आम्हाला परत द्या. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत. जर सुप्रीम कोर्टाने चिन्ह दिले नाही, तर निदान ते गोठवा. ओरिजनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. पत्रकारांनी विचारले की, जर चिन्ह मिळाले नाही, तर पुढे काय? यावर खैरे म्हणाले की, ते पक्षप्रमुख ठरवतील, पण आमची भूमिका स्पष्ट आहे, कोणालाही देऊ नये, कारण धनुष्यबाण हा शिवसेनेच्या आत्म्याचा भाग आहे.
Bow and arrow our faith, don’t give it to us but get it: Chandrakant Khaire got emotional
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा