भाऊ एकमेंकांसमाेर : निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशनमुळे राणे कुटुंबातच राजकीय संघर्ष

भाऊ एकमेंकांसमाेर : निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशनमुळे राणे कुटुंबातच राजकीय संघर्ष

विशेष प्रतिनिधी

कणकवली : विधानसभा निवडणुकीत राजकीय साेईसाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आमदार म्हणून ते निवडूनही आले. मात्र, ही खराेखरच राजकीय साेय हाेती का राणे कुटुंबात संघर्ष आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण नीलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी स्टिंग ऑपरेशन करून राेकड सापडल्याचा दावा केला हाेता. याच कार्यकर्त्याच्या घरी नीलेश यांचे भाऊ व राज्य मंत्रीमंडळातील मंत्री नीतेश राणे यांनी भेट दिली.

अवैध रोख रक्कम ठेवून पैसे वाटपाच्या माध्यमातून निवडणूक प्रभावीत करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा नीलेश राणेंनी केला आहे. आता भाजपचे मंत्री नितेश राणे यांनीच आपल्या भावाच्या आरोपांवर प्रत्युत्तर देत, हमाम में सब नंगे हैं, अशी टोलेबाजी केली. इतकेच नाही तर नितेश राणे यांनीही भाजप पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या घरी भेट दिली.

25 नोव्हेंबरच्या रात्री नीलेश राणे त्यांच्या पथकासह थेट भाजप पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या घरात पोहोचले. त्यांच्या मते, तिथे हिरव्या रंगाच्या पिशवीत सुमारे 25 लाखांची बेहिशोबी रोख रक्कम आढळून आली. संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये टिपला गेला असून, राणेंनी तो प्रसारमाध्यमांना आणि पोलिसांना दिल्याचे सांगितले. या प्रकरणामागे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचा हात असल्याचा थेट आरोप करत, जेव्हा जेव्हा चव्हाण सिंधुदुर्गात येतात, तेव्हा काहीतरी संशयास्पद घडतचं, असा घणाघात केला. मैदानात उतरा, पैशाच्या जोरावर मतं खरेदी करू नका, असा जाहीर संदेशही त्यांनी दिला. आणखी काही घरे आणि काही जणांकडे अशाप्रकारे काळा पैसा साठवून ठेवण्यात आल्याचा दावा करत, राणेंनी काही नावंही जाहीर केली. आमच्याकडे संपूर्ण यादी आहे. कोण कुठे, किती रक्कम देतो याचे पुरावे लवकरच देऊ, असे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.



यावर. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी स्वतःच्या पक्षाचे समर्थन करत तडाखेबाज प्रतिक्रिया दिली. खासगी व्यवसायातून कमाई झालेली रक्कम आपल्याकडे ठेवली तर त्यात चूक काय? फक्त राजकीय चष्म्यातून बघू नका, असे ते म्हणाले. आमच्या विरोधकांनी आमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये. नियम जो आहे तो सर्वांनाच लागू. हमाम में सब नंगे है! अशा शब्दांत त्यांनी भावाच्या स्टिंगवर पलटवार केला. याशिवाय, युतीची चर्चा करण्याची वेळ गेली. प्रक्रियेनुसारच सर्व निर्णय होतात, असे म्हणत त्यांनी भावाच्या युतीविषयी आरोपालाही उत्तर दिले.

एका घरात सापडलेल्या पैशामुळे संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला आहे. प्रचाराची दिशा पूर्णपणे बदलली आहे. राणे विरुद्ध राणे असा राजकीय संग्राम कोकणकार बघत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष थेट या वादात अडकले आहेत. शिवसेना शिंदे गटानेही त्यांच्या आमदाराच्या पाठीशी उभं राहत भाजपवर हल्ले चढवले आहेत. दुसरीकडे, विरोधकांनीही भाजपचा पैशाचा खेळ असा ठपका ठेवत सरकारवर धारेवर धरले आहे.

Brothers fight each other: Nilesh Rane’s sting operation sparks political conflict within the Rane family

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023