विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आगामी पाच वर्षांत ऐतिहासिक वळणावर येणार असून येत्या पाच १००० नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याची योजना आहे, तर २०२७ पर्यंत देशात पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. Ashwini Vaishnav
दरवर्षी ३०,००० वॅगन्स आणि १५०० इंजिन भारतात तयार केली जात आहेत, ज्याचे प्रमाण उत्तर अमेरिका आणि युरोपच्या एकत्रित उत्पादनापेक्षाही जास्त आहे. ही प्रगती ‘मेक इन इंडिया’च्या दृष्टीने एक महत्त्वाची झेप मानली जात आहे, असे सांगून वैष्णव म्हणाले, रेल्वेवरील गुंतवणूक पूर्वीच्या ₹२५,००० कोटींवरून वाढून ₹२.५२ लाख कोटींवर पोहोचली आहे. याशिवाय ₹२०,००० कोटीची अतिरिक्त गुंतवणूक सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (PPP) केली जात आहे. गेल्या ११ वर्षांत भारताने ३५,००० किलोमीटर नवीन लोहमार्ग उभारले आहेत, जे जर्मनीच्या संपूर्ण रेल्वे नेटवर्कइतके आहे. केवळ गेल्या वर्षातच ५,३०० किमी नवीन ट्रॅक टाकण्यात आला आहे. Ashwini Vaishnav
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
भारत-जपान सहकार्याने उभारल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे प्रोटोटाइप २०२६ मध्ये तयार होणार आहे, आणि २०२७ मध्ये व्यावसायिक सेवा सुरू होईल. आयआयटी मद्रास आणि आयआयटी रुडकी यांचे वैज्ञानिक संशोधनात योगदान देत आहेत. अनेक हाय-स्पीड रेल्वेचे भाग आता भारतात तयार होत असून काही विदेशात निर्यातही केले जात आहेत.
रेल्वेच्या मालवाहतूक क्षमतेबाबत सांगताना वैष्णव म्हणाले, सध्या देशातील २९% माल रेल्वेने वाहिला जातो, आणि ते लवकरच ३५% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. रस्त्यांपेक्षा रेल्वे अधिक स्वस्त व पर्यावरणपूरक असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांत २,००० जनरल डबे जोडण्यात आले आहेत. ‘अमृत भारत’ आणि ‘नमो भारत’ या नव्या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. भारतातील रेल्वे तिकिटांचे दर पाकिस्तान व बांगलादेशपेक्षाही स्वस्त असल्याचा दावा त्यांनी केलापूर्वी दरवर्षी १७० अपघात व्हायचे, ते आता ३० पेक्षा कमी झाले आहेत. रेल्वे अपघातांमध्ये ८०% घट झाली आहे, जी सुरक्षिततेच्या दिशेने मोठी उपलब्धी मानली जात आहे.
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले की, भारतीय रेल्वेचे संपूर्ण खाजगीकरण करण्याचा कोणताही विचार नाही. मात्र जपान व स्वित्झर्लंडसारखी व्यावसायिक व नीटसंघटित प्रणाली भारतात विकसित केली जाईल.
Bullet train will run till 2027, plan to launch 1000 new trains in the next 5 years, says Railway Minister Ashwini Vaishnav
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी