Nitesh Rane : महाराष्ट्रातही बुरख्याचा वाद, नितेश राणे यांनी केली ही मागणी

Nitesh Rane : महाराष्ट्रातही बुरख्याचा वाद, नितेश राणे यांनी केली ही मागणी

Nitesh Rane

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Nitesh Rane दहावी आणि बारावीची परीक्षा केंद्रांमध्ये बुरखा घालून प्रवेश देऊ नये, असे पत्र मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना दिले आहे. हिंदू मुलांसाठी वेगळे नियम आणि इतर धर्मियांना वेगळे नियम नको, त्यासोबतच अशा प्रकारामुळे कॉपीचे प्रमाण वाढू शकते, अशी भीती देखील राणे यांनी व्यक्त केली आहे.Nitesh Rane

10वी आणि 12वीच्या परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. गरज पडल्यास बुरखाधारींची चौकशी करण्यासाठी महिला पोलीस आणि अधिकारी किंवा शिक्षक यांना चौकशीचे निर्देश शासन स्तरावरुन देण्यात आले आहेत.



10वी आणि 12वीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. या परीक्षांच्या आधारावर पुढील निर्णय विद्यार्थी घेत असतात. या परीक्षा पारदर्शकपणे झाल्या पाहिजे, कॉपीमूक्त असल्या पाहिजे. मात्र जर परीक्षार्थी बुरखा घालून आले असतील तर परीक्षा कॉपीमुक्त आणि निर्भेळ वातावरणात होत आहे, हे सांगणे कठीण होऊन जाते. बुरख्याआडून इलेक्ट्रॉनिक उपकरणांचाही वापर होऊ शकतो.

सरकारने परीक्षेच्या काळात बुरखा घालण्याची परवानगी दिली असेल तर ती त्यांनी मागे घ्यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. निवडणुकीच्या काळात बुरखा घालून गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. सर्व विद्यार्थ्यांना एकसारखाच गणवेश असला पाहिजे, काही विशिष्ट लोकांनाच विशेष सवलत कशासाठी असाही सवाल मंत्री राणेंनी उपस्थित केला.

नितेश राणे हे त्यांच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. आता त्यांनी दहावी आणि बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून बुरखा घालून परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये अशी मागणी केली आहे.

Burkha dispute in Maharashtra also, Nitesh Rane made this demand

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023