विशेष प्रतिनिधी
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील मोक्याची 1804 कोटींची महार वतनाची 40 एकर जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचे प्रकरण समोर आल्यावर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पार्थ पवारांना वगळत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. शितल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू अशी या तिघांची नावे आहेत. Parth Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील मोक्याची 1804 कोटींची महार वतनाची 40 एकर जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचे प्रकरण समोर आल्यावर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि उपनिबंधक यांना निलंबित करण्यात आले आहे. शिवाय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे. असे असले तरी मुद्रांक शुल्क विभागाने बावधन पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यानंतर आता बावधन पोलिसांनी पार्थ पवारांना वगळत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली की, पुणे मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनंतर कोरेगाव जमीन व्यवहार प्रकरणात शितल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू यांच्याविरोधात भारतीय न्याय सहिंता 2023 चे कलम 316(5), 318(2), 3(5) सह महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट कलम 59 प्रमाणे (भादवि कलम 409, 420, 34) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपसात संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचा कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड म्हणाले की, आरोपी शितल तेजवाणीने या जागेची पॉवर ऑफ एटर्नी असल्याचे सांगत जागा विक्रिचा व्यवहार केला. त्यानंतर आरोपी दिग्विजय पाटील यांनी पार्थ पवारांचा मामेभाऊ आणि व्यवसायिक भागीदार असल्याचे सांगत 5 कोटी 89 लाख 31 हजार 800 रुपये इतके मुद्रांक शुल्क बुडवण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील उपनिबंधक रविंद्र तारु यांच्याशी संगनमनत केले.
सेस वसुल करणे अपेक्षित असताना रविंद्र तारु यांनी शासनाचे 5 कोटी 89 लाख 31 हजार 800 रुपयांचे नुकसान केले. त्यामुळे मुद्रांक शुल्क न घेता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा करण्यात आला आहे. तसेच स्टँम्प ड्युटी बुडवल्याप्रकरणी देखील तपास होईल, विशाल गायकवाड यांनी स्पष्ट केले. याचवेळी त्यांना पार्थ पवारांबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर डीसीपी विशाल गायकवाड म्हणाले की, फिर्यादीने तक्रारीत सध्या तरी पार्थ पवार यांचे नाव दिलेले नाही, त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही.
Case registered against three in Koregaon Park land deal case, but Parth Pawar excluded
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar : पक्षाची प्रतिमा खालावणाऱ्यांना मायनस करावे लागेल, पुण्यातील महिला प्रवक्त्यांवर अजित पवार बरसले
- पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले ‘काम नसेल करायचं तर पदं सोडा’
- पार्थ पवार यांच्या जमिनीबाबत तक्रार आली की चौकशी सुरू करणार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण
- Ambadas Danve : तुम्हाला का सर्व फुकट लागते? कोरेगाव पार्क जमिनीच्या व्यवहारावरून अंबादास दानवे यांचा अजित पवारांना सवाल


















