Maratha protesters : सोलापूर जिल्ह्यात मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे !

Maratha protesters : सोलापूर जिल्ह्यात मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे !

Maratha Protesters

विशेष प्रतिनिधि 

सोलापूर : मनोज जरांगे यांनी त्यांचे मुंबईतील आंदोलन आखेर मागे घेतले आहे. यादरम्यान आंदोलकांनी केलेल्या गर्दीमुळे तसेच स्थानिक मालमत्तेचे नुसकान केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. दुसरीकडे मात्र सोलापूर जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मात्र मागे घेतले जात आहेत. Maratha protesters



मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर आतापर्यंत सोलापूर शहरात ७ तर ग्रामीणमध्ये ५९ गुन्हे दाखल झाले होते. आता त्यामधील ८ गुन्हे वगळता आंदोलकांवरील ५१ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. यासंबंधीचा अहवाल पोलिसांनी कोर्टात सादर केला आहे. राज्यसरकारने देखील यासंबंधीची माहिती मंगळवारी मागवून घेतली.

गुन्हे मागे घेणे कसे शक्य?

मराठा आंदोलकांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. मात्र, राज्यसरकरला पोलिसांनी नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा अधिकार असतो. चार्जशीट दाखल होण्याअगोदर सरकार थेट शासन निर्णय काढून आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ शकते. हे गुन्हे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ नुसार मागे घेतले जाऊ शकतात. जनहितासाठी असे निर्णय घेतले जातात. चार्जशीट तयार झालेली नसल्यास सरकार थेट गुन्हे मागे घेऊ शकते. Maratha protesters

परंतु, चार्जशीट तयार होऊन केस कोर्टात गेलेली असल्यास सरकार कोर्टाला विनंती करून केसेस मागे घेऊ शकते. त्याआधी, जिल्हास्तरावर एक समिति नेमून पोलीस व सामान्य प्रशासनातील अधिकारी जिल्ह्यातील अश्या गुन्ह्यांविषयी अहवाल तयार केलं जातो. त्यानंतर संबंधितांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भातही एक अहवाल तयार केला जातो. करोना काळात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे याप्रकरे लोकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात आले होते. आता याचप्रकरे मराठा आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेतले जात आहेत. Maratha protesters

कोणते गुन्हे मागे घेतले जातील?

आतापर्यंतच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मराठा आंदोलकांवर हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात आढथळा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, या सारखे गुन्हे दाखल आहेत. आता यातील काही गुन्हे हे फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार मागे घेतले जाणार आहेत. फौजदारी प्रक्रिया संहितेत पोलिसांनी लोकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. परंतु यात सरकार जीआर काढून केवळ किरकोळ स्वरूपाचे गुन्हे मागे घेऊ शकते. ज्यामध्ये रस्ता अडवणे, सार्वजनिक वाहतूक विस्कळीत करणे, कलम १४४चे उल्लंघन करणे, असे गुन्हे असतात. परंतु, तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशनवर हल्ला करणे, जीवाला धोका पोहोचवणे, लाखोंच्या संपत्तीचे नुकसान करणे याप्रकारचे गंभीत गुन्हे मागे घेतले जाऊ शकत नाही. Maratha protesters

सध्या गुन्ह्यांची स्थिति काय?

सोलापूर शहरात मराठा आंदोलकांवर एकूण सात गुन्हे दाखल आहेत. ज्यातील ५ केसेस कोर्टात दाखल आहेत, तर दोन केसेस या कोर्टातच प्रलंबित आहेत. हे गुन्हे मागे घेण्याबाबत सोलापूर शहर पोलिसांनी न्यायालयात अहवाल सादर केला आहे.
ग्रामिणमध्ये मराठ आंदोलकांवर ५९ गुन्हे आहेत. ज्यातील ४० गुन्हे मागे घेतले असून ११ गुन्ह्यांचे अंतिम चार्जशीट कोर्टात पाठवलेले नाही. आता केवळ ८ गुन्हे प्रलंबित असून तेही मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Cases against Maratha protesters in Solapur district withdrawn!

महत्वाच्या बातम्या


		

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023