विशेष प्रतिनिधि
मुंबई : मुंबई मधील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे तब्बल ५ दिवस आमरण उपोषण चालू होते. मात्र मंगळवारी (ता.२) सरकारने मुख्य मागण्या मान्य केल्यामुळे, आखेर त्यांनी आपले उपोषण सोडले व त्यांच्यासोबतच सर्व मराठा आंदोलकांनीही रात्रीच मुंबई सोडली. मात्र त्यानंतर पोलिसांनी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. Maratha protesters
मंगळवारी राज्य सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्यामुळे जरांगे आणि इतर सर्व आंदोलक माघारी फिरले. मात्र त्याआधी ४ दिवस मराठा आंदोलकांनी आझाद मैदान परिसरात प्रचंड गोंधळ घातला होता. केवळ आझाद मैदान परीसरच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानाकावरही (CSMT) आंदोलकांनी वाहतूक कोंडी केली होती. काल सर्व आंदोलक माघारी फिरल्यामुळे हा संपूर्ण परिसर आता रिकामा झाला आहे. मात्र, पोलिसांनी आता या परिसरात गर्दी करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे.
मनोज जरांगे पाटील त्यांच्यासह हजारो मराठा बांधवांना घेऊन मुंबई दाखल झाले होते. सोबत बऱ्याच गाड्याही होत्या, परंतु मैदानात मर्यादित जागा शिल्लक असल्यामुळे अनेक मराठा आंदोलकांनी जवळपासच्या परिसरात आश्रय घेतला होता. केवळ जवळपासचा परिसरच नाही तर काही आंदोलकांनी चक्क मंत्रालय, आमदार निवास, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मरीन ड्राइव्ह परिसरातही फिरस्ती केली होती. दरम्यान, या भागात फिरत असतांना आंदोलकांचे काही स्थानिक नागरिकांशी, तर काही पोलिसांशी देखील वाद झाले होते. Maratha protesters
त्यामुळे आता, या परिसरात गर्दी करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे. मरीन ड्राइव्ह आणि डोंगरी पोलिसांनी बेकायदेशीरपणे गर्दी जमवणे आणि दमदाटी केल्याप्रकरणी मराठा आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. मराठा आंदोलक मुंबईतून माघारी फिरल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. यावर अद्यापही मनोज जरांगे पाटील किंवा इतर मराठा आंदोलकांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
याआगोदरही, जुहू परिसरात पोलिसांनी याच प्रकरणात काही मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल केला होता. मराठा आंदोलक व बेस्ट बस प्रवशांमध्ये झालेल्या मारहाणी संबंधी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा होता. रविवारी जुहू बस स्थानकात आंदोलक आणि बस प्रवाशांमध्ये तूफान हाणामारी झाली होती. यानंतर मराठा आंदोलकांनी बसच्या काचा फोडल्या होत्या. याप्रकरणी जुहू पोलीस स्थानकात आज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरक्षणासाठी आंदोलन करत असतांना स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी आंदोलकांनी घ्यायला हवी होती. मात्र याऊलट आंदोलकांनी सार्वजनिक मालमत्तेच नुकसान केलं. तसेच ठिकठिकाणी वाहतूक कोंडी केली, रेल्वे स्थानकांवर गर्दी केली. ज्यामुळे स्थानिक नगरिकांसोबतच, स्थानिक व्यवस्थेवरही बराच ताण पडला. याविरोधात पोलिसांनी घेतलेल्या निर्णयावर आता मराठा आंदोलक आणि जरांगे पाटील यांची काय प्रतिक्रिया असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. Maratha protesters
Cases are being filed against Maratha protesters in Mumbai for ‘this’ reason
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल