Mahadev Munde महादेव मुंडे खून प्रकरणात माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस

Mahadev Munde महादेव मुंडे खून प्रकरणात माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस

Mahadev Munde

विशेष प्रतिनिधी

बीड : महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्या नागरिकाला रोख बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.
एसआयटीचे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत यांनी सांगितले की खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एसआयटीकडून वेगाने तपास सुरू आहे. Mahadev Munde

मात्र, काही ठोस पुरावे व माहिती अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे जनतेच्या मदतीसाठी आवाहन करताना एसआयटीने एक अधिकृत पत्रक जारी केले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, “या प्रकरणातील कुणालाही ठोस माहिती असल्यास त्यांनी ती तपास पथकाला तात्काळ द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल आणि त्यांना बक्षीस देण्यात येईल.



महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी आता ‘एसआयटी’ स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. या प्रकरणात कोणी असले तरी त्याला सोडणार नाही, असा शब्दही दिला होता.

परळीच्या तहसीलदार परिसरात २१ ऑक्टोबर २०२३ रोजी महादेव मुंडे यांची हत्या झाली. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड व त्याचा मुलगा सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येला दोन वर्षांचा कालावधी होत आला तरी कोणाला अटक करण्यात आलेली नाही. महादेव मुंडे यांची हत्या २१ ऑक्टोबर २०२३ रोजी परळीतील तहसीलदार परिसरात झाली असून तेव्हापासूनचा सगळा तपशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले होते.

Cash reward for information in Mahadev Munde murder case

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023