विशेष प्रतिनिधी
नाशिक: Chhagan Bhujbal शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपदाची संधी हाेती असे वक्तव्य केले हाेते. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनीही माझ्या आयुष्यात दोन-तीन वेळा मुख्यमंत्री होण्याची संधी आली होती, पण योग्य वेळ निघून गेली, अशी खंत व्यक्त केली.Chhagan Bhujbal
नाशिकमध्ये पत्रकारांशी बाेलताना भुजबळ म्हणाले, काँग्रेस सोडताना मला थांबवून मुख्यमंत्री करण्याचीही ऑफर मिळाली होती. तरी मी शरद पवार यांच्यासोबत राहिलो. सगळ्यांनी इच्छा धरायला हरकत नाही, राजकारणात मेहनत करा, योग्य वेळ येते.
एका कार्यक्रमात बाेलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची आपली इच्छा व्यक्त केली हाेती. त्यावर अजित पवारांना टाेला मारताना संजय राऊत यांनी अजित पवार कधीही मुख्यमंत्री हाेऊ शकणार नाही. शिवसेनेत असते तर छगन भुजबळ मुख्यमंत्री हाेऊ शकले असते असे म्हटले हाेते.
यापूर्वीही छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत विधान केले हाेते. पुण्यात एका कार्यक्रमात बाेलताना ते म्हणाले हाेते, मी काँग्रेस सोडली नसती तर मुख्यमंत्री झालो असतो. दिल्लीत माझ्या नावावर एकमत झाले होते पण मी शरद पवार यांच्यासाेबत असल्याने मुख्यमंत्री झालो नाही.
जातीगणनेबाबत भुजबळ म्हणाले, महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण देशभरात जातनिहाय जनगणनेसाठी रॅली केल्या. स्वातंत्र्यानंतर अनेक वेळा जनगणना झाली, पण जातीवार माहिती गोळा करण्यात आली नाही. ओबीसी समाज ५२ टक्के असूनदेखील फक्त २७ टक्के आरक्षण मिळाले. कोर्टात वारंवार ’त्यांची संख्या किती’ असा प्रश्न विचारला जातो, म्हणून ही जनगणना अत्यावश्यक होती. नरेंद्र मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. यामुळे निवडणुका लांबतील, असे वाटत नाही.
खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर केलेल्या टिकेबाबत ते म्हणाले, शरद पवार यांचे संपूर्ण आयुष्य राजकारणात गेले आहे. ते संरक्षण मंत्री होते, त्यांना काय बोलायचे ते माहीत आहे. सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचा अर्थ सैन्याच्या मागे उभे राहणे असते.
‘लाडकी बहीण’ योजनेवर बोलतांना ते म्हणाले, दलित आणि आदिवासींसाठी स्वतंत्र निधी असतो. सध्या निधी एकत्र करून पूर्तता केली जात आहे. भविष्यात राज्याचा उत्पन्न वाढल्यावर ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी स्वतंत्र निधी उभा केला जाईल.
Chance to become Chief Minister two-three times in life but… Chhagan Bhujbal’s regret
महत्वाच्या बातम्या
- Pakistan पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई; पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी
- Neelam Gorhe : पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना चौकशीचे निर्देश
- Sonu Nigam : सोनू निगमवर गुन्हा दाखल, कन्नडमध्ये गाणे गायचा आग्रह अन् म्हणाला यामुळेच पहलगाममध्ये युद्ध झालं…
- Ajit Pawar : तर अजित पवार, एकनाथ शिंदे हाेऊ शकतात मुख्यमंत्री… संजय राऊत यांचा दावा