विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठा आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती करा. त्यासाठी तामीळनाडूचा दाखला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. मात्र, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शरद पवारांचा दावा खाेडून काढला आहे. तामिळनाडूचे आरक्षण अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि ते टिकणारे नाही, असे उत्तर पाटील यांनी दिले आहे. Chandrakant Patil
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले आहे यावर बाेलताना भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठे हे सामाजिक मागास नाहीत. मराठ्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळालेली नाही. इडब्ल्यूएस आरक्षणालाच मराठा समाजाचे खरे आरक्षण आहे. एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार केवळ मागासवर्गीय आयोगाला आहे, तो शिंदे समितीला नाही.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, कायदेशीरदृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसी मधून आरक्षण मिळणे अशक्य आहे. आता वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या मान्य केल्या तरी त्या कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील. पितृसत्ताक पद्धतीनुसार सगेसोयरे हे फक्त वडिलांकडचेच मानले जातात. आता लाखो मराठा बांधवांना कुणबी दाखल्याचा लाभ होत आहे. Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिली असतानाही सामान्य मुंबईकरांना वेठीस धरणे चुकीचे आहे. हे आंदोलन राजकीय असून, येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत ओबीसी आरक्षण घेऊन त्याचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस कधीही खोटे बोलत नाहीत, पण काही लोक नेहमीच ‘खोटं बोल पण रेटून बोल’ असे करतात.
Chandrakant Patil Exposes Sharad Pawar’s Claim on Tamil Nadu Reservation
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा