विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Chandrakant Patil राजकीय वाद सुरू आहे. यामध्ये अभिनेत्रीचे नाव जोडणं आमदार सुरेश धस यांना शोभत नाहीत. सुरेश धस यांना आज मी फोन करणार आहे. सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये, अशी तंबी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. Chandrakant Patil
कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीच्या चारि त्र्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमी काळजी घेतली. प्राजक्ता माळी यांनी देखील काल प्रेस घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी सुरेश धस यांना स्वतः विनंती करणार आहे की ते पक्षाचे आमदार आहेत. तरीदेखील तुम्ही असं काम करत आहे.हे तुम्ही असं करू नये, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. Chandrakant Patil
Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट
धनंजय मुंडे यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील. ते याबद्दल ठरवतील. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे डावा उजवा असं कधीही नसतं”, असे सांगत चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सहा दिवसाचं अधिवेशन असून देखील चार ते साडेचार तासांचा वेळ या विषयाच्या चर्चेसाठी दिला होता. त्यावेळी सर्वांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.Chandrakant Patil
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरही दिलं आहे. त्यात त्यांनी कोणताही शंका ठेवलेली नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे की मी कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही. त्यानुसार ते पावलं उचलत आहेत. प्रत्येकाने भावना व्यक्त करणे यात काही गैर नाही. मात्र देवेंद्र फडणवीस कोणालाही सोडणार नाहीत.
Prajakta Mali dispute, Chandrakant Patil will call MLA Suresh Dhas
महत्वाच्या बातम्या
- South Korea दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, 28 ठार; लँडिंग गिअर बिघडले, धावपट्टीवर स्फोट
- Goa : गोवा बनावटीची 31 लाख रुपयांची दारू जप्त
- उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट