विशेष प्रतिनिधी
पुणे : गुन्हेगारासोबत फोटो काढल्यामुळे त्या गुन्ह्यात आमचा सहभाग होत नाही. आम्ही कधीही गुन्हेगारीला पाठिंबा दिलेला नाही. एखाद्या नेत्याची जाणीवपूर्वक बदनामी केली तर त्याचा परिणाम शहराच्या प्रतिमेवर होतो. परदेशी गुंतवणूक आणि उद्योग येत असताना अशा नकारात्मक गोष्टींमुळे शहराची प्रतिमा धोक्यात येते.” Chandrakant Patil
कोथरूड परिसरातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. या भेटीत गुन्हेगारीच्या घटना आणि परिसरातील सुरक्षेची स्थिती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील म्हणाले, “दररोज हजारो लोक भेटायला येतात, त्यात एखादा गुन्हेगार असू शकतो. पण त्यामुळे आमचा त्याच्याशी संबंध जोडणे चुकीचे आहे. पोलिस प्रशासनाला आम्ही स्पष्ट सांगितले आहे, आमच्या नावाने कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तरी त्याकडे दुर्लक्ष करा. गुन्हेगारांचे आर्थिक कंबरडे मोडण्यासाठी ठोस कारवाई करा. लेखी तक्रारी आल्या की तातडीने कारवाई करा.”
पाटील यांनी सांगितले की, “शहरात दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी समोर बोलवून त्यांच्यावर मानसिक दबाव आणावा. गेल्या काही महिन्यांत खुनांच्या घटनांत घट झाली आहे आणि पोलिसांचा दबदबा वाढला आहे.”
कोथरूडमधील काही संवेदनशील घडामोडींवर बोलताना ते म्हणाले, “कोथरूड हा हिंदू बहुल भाग आहे. येथे काही मुस्लिम तरुणांच्या हालचाली दिसत आहेत. धार्मिक कारणांमुळे तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सतर्क राहावे. प्रत्येक धर्माचा आदर राखणे आवश्यक आहे, पण उपासना कधी, कुठे आणि कशी करायची यावर शिस्त पाळली पाहिजे. धर्मादाय आयुक्तांनी कोथरूडमधील दर्ग्याच्या प्रकरणाकडे लक्ष द्यावे.”
कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळच्या पासपोर्ट प्रकरणाचा उल्लेख करताना पाटील म्हणाले, “घायवळला पासपोर्ट कोणी मिळवून दिला, हे सर्वांना ठाऊक आहे. काही मोठ्या नावांचा यात सहभाग असूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. ठोस पुरावे नसताना नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. त्यामुळे शहराची प्रतिमा खराब होते.”
ते म्हणाले, “मुख्यमंत्री अल्पवयीन गुन्हेगारांच्या वाढत्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत. या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यात येतील. वाहतूक व्यवस्थेतील गोंधळावर नियंत्रणासाठीही पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.”
Chandrakant Patil Rebukes Critics over Photo Controversy
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी


















