विशेष प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टिके वरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार घणाघात केला आहे संजय राऊत वगैरे खूप छोटी माणसं आहेत. पंतप्रधान मोदी समजायला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पिलावळीला वेळ लागेल, असे बावनकुळे यांनी केला.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याऐवजी मोदी कार्यक्रमांत हास्यविनोद करत फिरत आहेत अशी टीका केली होती. यावर पुण्यात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, संजय राऊत यांना टीका-टिप्पणी व्यतिरिक्त दुसरी भाषा येत नाही. त्यांची वक्तव्ये समाजात तेढ निर्माण करणारी असतात. संजय राऊत वगैरे खूप छोटी माणसं आहेत. पंतप्रधान मोदी समजायला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पिलावळ्यांना वेळ लागेल.
बावनकुळे म्हणाले, राष्ट्रकल्याणाकरता या देशातील कोणत्याही व्यक्तीला हानी होऊ न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तान आणि नक्षलवाद्यांचा बीमोड केल्याशिवाय राहणार नाहीत. संजय राऊतांच्या चिथावणीखोर वक्तव्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही. ते सामाजिक स्वास्थ्य खराब करत असतात.पंतप्रधान योग्य वेळी योग्य निर्णय घेत असतात. एकशे चाळीस कोटी भारतीयांना सुरक्षित ठेवण्याचे काम ते करतात.
संजय राऊत आता काँग्रेसमय झाले आहेत. त्यांनी आता काँग्रेसचे संविधानच स्वीकारले आहे. त्यामुळे ते काँग्रेसची भाषा बोलतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
लाडकी बहीण योजनेसाठी समाजकल्याण विभागाचा निधी वळविल्याने मंत्री संजय शिरसाट यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. यावर बावनकुळे म्हणाले, लाडकी बहीण योजना सर्वच समाजाची आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती, आदिवासी या सगळ्याच प्रवर्गातील लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागाने आपला वाटा दिला तर हरकत नाही. सामूहिक निर्णय घेतल्यावर तो सर्वांसाठीच बंधनकारक असतो.
Chandrashekhar Bawankule slams Uddhav Thackeray and his Pilavali… over criticism of the Prime Minister
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती