विशेष प्रतिनिधी
मुंबई: लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळामध्ये काही बदल होत आहेत, त्यामुळे वेळ लागत आहे. ज्या महिलेला पती आणि वडील नाही त्यांना केवायसी करता येत नाहीये. हीच अडचण लक्षात घेऊन आता संकेतस्थळात महत्त्वाचे बदल केले जात आहेत. या बदलांमुळे आता सर्व महिलांना केवायसी करता येईल. त्यासाठीच हे बदल केले जात आहेत, असे व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. Ladki Bhahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाखो लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत पाठवली जाते, राज्य सरकारने सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन केले असून त्यासाठी संकेतस्थळही उपलब्ध करून दिले आहे. मात्र, ही ई-केवायसी करताना येत असलेल्या अनेक तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.
केवायसी करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, सध्या संकेतस्थळात काही बदल केले जात असून त्यामुळे वेळ लागत असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. .
लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर सध्या केवायसी करताना खूप अडचण येत आहे. या तांत्रिक अडचणीवर तटकरे यांनी भाष्य करताना म्हटले की, महिलांना येत असलेली तांत्रिक अडचण लक्षात घेण्यात आले आहेत. सध्या संकेतस्थळात काही बदल करण्यात येत आहेत. हे बदल झाल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही. लगेच केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
Changes in the website of Ladki Bhahin Yojana, all women can do KYC
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















