विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन करण्यासाठी गोंदिया जिल्हा दिल्यामुळे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ चांगले संतप्त झाले. त्यामुळे शेवटी गोंदिया येथील झेंडावंदनाची जबाबदारी भाजपच्या मंत्र्याकडे द्यावी लागली. Chhagan Bhujbal
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यावेळी रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे आणि नाशिकसाठी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, यावरून शिवसेनेत प्रचंड नाराजी झाल्यामुळे प्रकरण तापले आणि अवघ्या 24 तासांत मुख्यमंत्र्यांना रायगडसह नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय स्थगित ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. दरम्यान, त्यानंतर आधी 26 जानेवारी रोजी आणि आता 15 ऑगस्ट रोजी झेंडावंदनाचा मान कुणाला मिळणार, याची सर्वांना उत्कंठा लागून राहिली होती. Chhagan Bhujbal
यावेळी नाशिकमध्ये झेंडावंदनाचा मान भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना मिळाला आहे. तर मंत्री झालेल्या छगन भुजबळ यांना गोंदियात ध्वजवंदनाचा मान मिळाला आहे. मात्र, नाशिक सोडून गोंदियाला पाठवल्यामुळे छगन भुजबळ संतप्त झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार आहेत तरीही नाशिकऐवजी गोंदिया जिल्हा का दिला, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे गोंदियाला न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
नाशिक न मिळाल्यामुळे नाराज झालेले मंत्री छगन भुजबळ यांनी गोंदियाला जाण्यास नकार दिल्याने गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
Chhagan Bhujbal angry over Gondia district being given for flag hoisting
महत्वाच्या बातम्या
- Amol Mitkari : आपल्या कार्यकर्तृत्त्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगलीय, अमाेल मिटकरींचा राधाकृष्ण विखे- पाटील यांना धमकीवजा इशारा
- Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर
- मनोज जरांगेंची चावी आणि रिमोट शरद पवार यांच्याच हातात, आमदार परिणय फुके यांचा हल्लाबाेल
- cabinet meeting : राज्यात १५ हजार पोलीस भरतीला मंजुरी, मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय