विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : मंत्रिमंडळाला अनुभवाची गरज असल्याने छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात त्यांना घेतलं असावं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारला टोला लगावला आहे. ”
पाटील म्हणाले, “सुरुवातीला छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलं होतं. आता पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं ही चांगली गोष्ट आहे. त्यांना याचा आनंद झाला असेल. रायगड आणि नाशिक हे मोठे जिल्हे असून नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर निर्णय लवकर घ्यायला हवा होता, पण सरकारने जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय अद्यापही प्रलंबित ठेवला आहे. आता भुजबळांसारखा अनुभवी नेता मंत्रिमंडळात आला आहे, त्यामुळे त्यांनाच नाशिकचे पालकमंत्री करावे लागेल.”
पक्षांतर्गत घडामोडींवरही भाष्य करताना ते म्हणाले, पक्षांतर्गत मोठे बदल होणार आहेत. विलिनीकरणाचा विषय तुम्ही चालवत आहात, आम्ही नाही. निवडणुकीत शक्य असेल तिथे आम्ही एकत्र येऊ. २५, २६, २७ तारखेला प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत, त्यामध्ये सर्व चर्चा होतील. शरद पवार गटाचे दोन लोक त्यांच्यासोबत शपथ घेणार असल्याचं म्हणणं हा पोरखेळ आहे. हाके माझे हितचिंतक आहेत, ते हितचिंतन करतात यात काही वावगं नाही. जे फोडले गेले आहेत ते भाजपकडून अजित पवारांच्या गटात गेले आहेत. आमच्या पक्षातून कोणी गेलेलं नाही. एक व्यक्ती थोड्याच काळासाठी गेली होती, पण ती पुन्हा परत आली. त्यामुळे मला यावर विचार करण्याची गरज वाटत नाही.”
बीडमधील परिस्थितीवर जयंत पाटील म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. वाटत होतं की काही बदलांनंतर परिस्थिती सुधारेल, पण तिथल्या लोकांना पोलिसांची जरब नाही. आजही जर मारहाण होत असेल आणि व्हिडिओ व्हायरल होत असतील, तर गुन्हेगारांचे धाडस खूप वाढलं आहे. बीडला बदनाम करण्याचं काम काही स्थानिक गुंड करत आहेत.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत कार्य सुरू करावं आणि नुकसान भरपाई त्वरित मिळवून द्यावी, अशी मागणी पाटील यांनी केली.
Chhagan Bhujbal in the cabinet as the government needs experience, Jayant Patil’s criticism
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर