विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : शेतजमिनीच्या कामासाठी तब्बल ४१ लाखांची मागणी करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी या प्रकरणात २३ लाख रुपये त्यांची घरीही पोहोचले आहेत. Chhatrapati Sambhajinagar
त्यानंतर १८ लाख रुपयांची मागणी त्यांनी तक्रारदाराकडे केली. अखेर या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.एसीबीच्या अधिकाऱ्यांना सापळा रचून लाचखोर विनोद खिरोळकरला अटक केली.
एसीबी अधिकाऱ्यांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता मोठं घबाड पोलिसांना सापडलं आहे. त्यामध्ये तब्बल ५० लाख रुपयांचे ५९ तोळे सोने एसीबीने जप्त केलं आहे. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी धाड टाकून लाचखोर अधिकाऱ्याला अटक केली.
तक्रारदाराकडे मागणी केलेल्या १८ पैकी ५ लाख रुपये घेताना एसीबीने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरला रंगेहात ताब्यात घेतले.घरात मोठं घबाड सापडलंएसीबीने खिरोळकर यांच्या घरातून तब्बल १३ लाख ६ हजार ३८० रुपयांची रोकड, ५९ तोळे सोन्याचे दागिने. तसेच, ३ किलो ५५३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने ज्याची किंमत ३ लाख ३९ हजार ३४५ रुपये एवढी आहे.
मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम अशी एकूण ६७ लाख ४५ हजार ३०८ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. तक्रारदाराला वर्ग २ ची जमीन वर्ग १ करायची होती. आणि याच करिता निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. त्यांनी संबंधिताकडे सदरील काम करून देण्यासाठी ४१ लाख रुपये मागितले होते. त्यातील २३ लाख रुपये संबधित तक्रारदाराकडून आधीच घेतले होते.
Chhatrapati Sambhajinagar Resident Sub-District Officer Arrested For Taking Bribe, Rs 50 Lakh Coins Found In House
महत्वाच्या बातम्या
- Rajendra Hagawane : राजेंद्र हगवणेला आसरा देणाऱ्या पाच जणांना अटक, कर्नाटकच्या माजी मंत्र्यांच्या मुलाची समावेश
- Amit Shah : हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पण
- Economy : अर्थव्यवस्थेत भारताने जपानला टाकलं मागे, आता जर्मनीची वेळ
- Jyoti Malhotras : ज्योती मल्होत्राच्या फोनवरून मोठा खुलासा, पाकिस्तानी युट्यूबरसोबत करत होती काम!
- Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी मोठी कारवाई