विशेष प्रतिनिधी
मुंबई : धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावरील छावा चित्रपटाला देशभरातील प्रेक्षकांची पसंती लाभत आहे. प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे. तिसऱ्याच दिवशी छावा शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
छावा’ सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी, शुक्रवारी भारतात पहिल्याच दिवशी ३३.१ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये वाढ झाली. शनिवारी ‘छावा’ने तब्बल ३९.३ कोटी रुपये कमावले. रिलीजनंतरच्या पहिल्या रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी ‘छावा’ने ४९.३ कोटी रुपये कमावले, अशी माहिती इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिली आहे. चित्रपटाचे तीन दिवसांचे भारतातील कलेक्शन १२१.४३ कोटी रुपये झाले आहे. बॉलीवूडमध्ये एखाद्या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांची कमाई करणे महत्वाचे मानले जाते.
Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
छावा’ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता होती. शुक्रवारी हा चित्रपट जगभरात रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा सांगणारा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. मोठ्या पडद्यावर ही कथा पाहून प्रेक्षक भावुक झाले आहेत.
विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ग्रँड ओपनिंग केली होती. त्यानंतर पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी वाढ झाली. आता ‘छावा’च्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. आधीच्या दोन्ही दिवसांच्या तुलनेत रविवारी चित्रपटाने जास्त कलेक्शन केले आहे.
प्रत्येक कलाकारांनी उत्तम प्रकारे भूमिका साकारल्या असून, याचे खरे श्रेय दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना जाते. विशेष कौतुक म्हणजे, ऐतिहासिक भूमिकांसाठी त्यांनी केलेल्या कलाकारांची निवड, यामध्ये तक्रारीसाठी कोणतीच जागा उरत नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ‘छावा’ चित्रपटाची निर्मित करण्याअगोदर शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ कादंबरीवर चार वर्षे अभ्यास केला. इतिहासातल्या बारकाव्यांचा काळजीपूर्वक आढावा घेतला. मात्र, त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास न मांडता, त्यांची युद्धनीती आणि शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर दाखविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, जो निश्चितच यशस्वी झाला आहे.
Chhava movie entered the Rs 100 crore club on the third day with strong earnings
महत्वाच्या बातम्या
- Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
- ”पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी अमेरिकेने रचला होता कट”
- Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करणारे दोघे गजाआड
- Sharad Pawar : शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला, एकनाथ शिंदेंच्या सत्कारामुळे भडकले संजय राऊत