विशेष प्रतिनिधी
पुणे : दादर येथील ऐतिहासिक हनुमान मंदिराला रेल्वे विभागाने दिलेल्या नोटीसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. फडणवीस म्हणाले, “मा. न्यायालयाने मंदिरांसाठी काही विशिष्ट श्रेणी निश्चित केल्या आहेत. या श्रेणीनुसार जुनी आणि ऐतिहासिक मंदिरं नियमित करता येतात. दादर हनुमान मंदिराच्या संदर्भातही रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढला जाईल.”
पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले,
पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि या सांस्कृतिक राजधानीत असा कार्यक्रम होणे ही आनंदाची गोष्ट आहे. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. मागील वेळी पुणेकरांनी या महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद दिला होता, यंदाही तोच उत्साह दिसेल याची खात्री आहे.
गेल्या अडीज वर्षांत पुण्याचा अजेंडा निश्चित केला असून त्याला गती देणे महत्त्वाचे आहे.”
हिंगोली येथील वादग्रस्त घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत. “या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सत्य समोर येईल यासाठी प्रशासनाला निर्देश दिले आहेत,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Chief Minister Devendra Fadnavis assured that the Dadar Hanuman Temple case will be discussed and resolved
महत्वाच्या बातम्या
- Raju Shetty साखरेचे दर कोसळल्याचा शेतकरी व ग्राहकांनाही फटका, राजू शेट्टी यांची चौकशीची मागणी
- Sanjay Raut’ : संजय राऊतांचा ‘नैराश्येतून एकला चलोचा नारा , विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
- Vijaya Rahatkar : काही महिलांकडून कायद्याचा गैरवापर, पण त्यामुळे महिला संरक्षण कायद्यांवर प्रश्नचिन्ह लावणे अयोग्य!!
- D Gukesh : बुद्धिबळाचा नवा राजा…ठरला भारताचा डी गुकेश! विजयानंतर अश्रू अनावर झाले