Devendra Fadnavis : शक्तिपीठ महामार्गात बदलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत, नवा मार्ग सोलापूर आणि सांगलीतून जाणार

Devendra Fadnavis : शक्तिपीठ महामार्गात बदलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत, नवा मार्ग सोलापूर आणि सांगलीतून जाणार

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Devendra Fadnavis नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ मार्गाबाबत निर्माण झालेला वाद आणि विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने या मार्गाच संरेखन (अलाइनमेंट) बदलण्याचा निर्णय घेतला आहे. शक्तिपीठला स्थानिक जनतेचा विरोध कमी आहे पण राजकीय नेत्यांचा विरोध अधिक आहे. त्यामूळ राज्य सरकारने नागपूर ते गोवा शक्तिपीठ मार्गाचे संरेखन बदलण्याचा निर्णय घेतला असून नवा मार्ग सोलापूर आणि सांगलीतून जाणार आहे, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.Devendra Fadnavis

नागपुर येथील रामगिरी या त्यांच्या निवासस्थानी दिवाळी मिलनाच्या निमित्ताने पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. फडणवीस म्हणाले की, विरोध प्रामुख्याने धाराशिव परिसरापुरता मर्यादित आहे. काही राजकीय नेत्यांनी या विषयाचा गैरसमज निर्माण करून आंदोलन रेटण्याचा प्रयत्न केला. परंतु सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. त्यामुळे शक्तिपीठ मार्गाचे नवे संरेखन सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमधून नेण्यात येईल, ज्यामूळ या दोन्ही जिल्ह्यांचा शक्तिपीठाशी थेट संपर्क प्रस्थापित होईल.धार्मिक पर्यटन आणि राज्यातील संपर्क सुविधा वाढविणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. नागपूर ते गोवा हा मार्ग अनेक जिल्ह्यांमधून जातो. जाणार असल्याने पर्यटन, व्यापारी देवाणघेवाण आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी तो लाभदायी ठरेल.Devendra Fadnavis

काही ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोध दिसून आला आहे. या विरोधाचा आदर ठेवत सरकारने मार्गात बदल केला जाईल.

चंदगड येथे एका आमदाराच्या नेतृत्वाखाली समारे ५०० शेतकऱ्यांनी मोर्चा काढून मार्ग त्यांच्या भागातून नेण्याची मागणी केली होती, याचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांचा हा उत्साह पाहून आम्ही त्या दिशेने मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार विकासकामांबाबत लोकांची मते ऐकते आणि योग्य ती सुधारणा करते.

प्रकल्पाला सुरुवातीला विरोध होणे ही नवीन गोष्ट नसल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, पुणे विमानतळासाठी जेव्हा भूसंपादन करण्यात आले, तेव्हा सुरुवातीला विरोध झाला होता. पण शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाल्यानंतर ९५ टक्के जमीन सहमतीने उपलब्ध झाली. फक्त पाच टक्के प्रकरणे कौटुंबिक कारणांमुके अडकली आहे.

राज्य सरकार प्रत्येक प्रकल्पात पारदर्शकता ठेवणार आहे. बळजबरीने जमीन घेणार नाही. शेतकऱ्यांना योग्य मोबदला, पुनर्वसन आणि पर्याय देण्यात येतील. सरकारचा उद्देश विकास घडविणे आहे, मतभेद निर्माण करणे नाही. शक्तीपीठ मार्गाच्या नव्या आराखड्यामुळ े मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणिकोकण या तिन्ही भागांमधील संपर्क अधिक सुकर होईल. या मार्गावरील धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे आणि औद्योगिक क्षेत्रांना जोडले जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Chief Minister Devendra Fadnavis hints at changes in Shaktipeeth highway, new route will pass through Solapur and Sangli

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023