विशेष प्रतिनिधी
पुणे : फलटण तालुक्यातील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांन वेग आला असून, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर या वादाला आणखी तोंड फुटले आहे.अंधारे यांनी पत्रकार परिषदेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या माजी खासदारावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. Chief Minister Fadnavis
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी पुण्यातील एका हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमासाठी आले होते. त्याच ठिकाणी ते माजी खासदारही उपस्थित होते, मात्र या दोघांमध्ये कोणतीही भेट किंवा संवाद झाला नाही. हेच यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.
याआधी फडणवीस यांनी फक्तन येथील कार्यक्रमात निंबाळकर यांच्यावरील आरोप फेटाळून त्यांना क्लीनचिट दिली होती. मात्र, फक्त चार दिवसांनंतरच फडणवीस यांनी त्या माजी खासदारांशी संवाद टाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही घटना मुख्यमंत्री त्या माजी खासदारावत नाराज असल्याचे स्पष्ट संकेत देत असून, सुषमा अंधारे यांच्या आरोपांनंतर फडणवीस अस्वस्थ आहेत, असे संकेत मिळत आहेत.
Chief Minister Fadnavis Avoids Meeting ‘That’ Former MP in Pune
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















