Chitra Wagh : रूपाली चाकणकर यांच्या मदतीसाठी चित्रा वाघ पुढे, राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना दिले उत्तर

Chitra Wagh : रूपाली चाकणकर यांच्या मदतीसाठी चित्रा वाघ पुढे, राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना दिले उत्तर

Chitra Wagh, Rupali Chakankar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्तेच्या घटनेनंतर विरोधकांकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना भाजपच्या आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) मदतीसाठी पुढे आल्या आहेत. एका व्यक्तीला टार्गेट करुन प्रश्न सुटणार नाही, असे उत्तर त्यांनी विरोधकांना दिले आहे.



राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे महिला आयोगाबाबत एक विशेष बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महिलांच्या सुरक्षेबाबत महत्वाची चर्चा झाली. या बैठकीला राज्यातील अनेक महिला नेत्या उपस्थित होत्या. या बैठकीनंतर बोलताना चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सांगितले की, ‘आजच्या बैठकीत चांगली चर्चा झाली, सर्वांनी चांगले इनपूट दिले. महिला आयोगाला ताकद देण्याची गरज आहे. महिला आयोगात काही लुप होल आहेत. त्यावर काम करावं लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात याबाबत आणखी बैठका होणार आहे. मी सुद्धा या पदावर काम केलं आहे. एका व्यक्तीला टार्गेट करुन प्रश्न सुटणार नाही.
राज्य महिला आयोगाकडे मेलद्वारे अनेक महिला तक्रार करत असतात. मात्र मेल वाचायला आणि त्याला रिप्लाय द्यायला माणसं नाहीत. त्यामुळे एका व्यवस्थेला टार्गेट करुन चालणार नाही. एक केस नाही तर प्रत्येक केसमध्ये महिला आयोगामध्ये अननियमितता झाली असेल तर त्याची चौकशी होईल. महिला आयोग कुठे चुकले ,भरोसा सेल कुठे चुकला याची चौकशी होईल, असे चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सांगितले.

महिला आयोगाचा अध्यक्ष राजकीय नसावा अशी मागणी काही विरोधकांनी केली आहे. याबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, महिला आयोगाचा अध्यक्ष राजकीय नसावा असं जे म्हणत आहे त्यांच्याही कार्यकाळात राजकीय अध्यक्ष होता. रुपाली चाकणकर यांची ही दुसरी टर्म आहे. विरोधकांच्या कार्यकाळातही राजकीय व्यक्तीकडेच महिला आयोगाचे नेतृत्व होते.

Chitra Wagh comes forward to help Rupali Chakankar, gives reply to opponents demanding resignation

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023