विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात चांगलीच जुंपली असून राऊत यांनी सपकाळ यांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केली आहे. महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळांनी मांडलेल्या भूमिकेवरून ही तक्रार केल्याचं कळतंय. मात्र संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलेल्या तक्रारीवरून काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसला सोबत घ्यावे अशी सूचना केल्याचे राऊत यांनी म्हटले होते. त्यावरून मनसेच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यावर राऊत यांना माफी मागावी लागली होती. यावरून सपकाळ यांनीही राऊत (Sanjay Raut) यांच्या बद्दल नाराजी व्यक्त केली होती. मनसेला सोबत घ्यायची की नाही याबाबत काँग्रेस हा एक कमांड निर्णय घेईल असे म्हटले होते.
निवडणूक आयोगाला भेटायला गेलेल्या शिष्टमंडळामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव होतं, मात्र ते अनुपस्थित राहिल्याने चर्चा सुरू झाल्या होत्या, त्याबाबतच्या प्रश्नावर सपकाळांनी उत्तर दिलं आहे. मनसेला सोबत घेण्यासंदर्भात हे शिष्टमंडळ नव्हतं. हे शिष्टमंडळ निवडणुकांमधील घोटाळ्यासंदर्भात भेटलं होतं. यामध्ये आघाडी-युतीच्या चर्चा होण्याचा प्रश्न नाही. काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आमचे लोक त्यात सहभागी झाले मला दिल्लीला बोलवण्यात आले म्हणून मी तिकडे गेलो, अशी माहिती सपकाळांनी दिली आहे.
http://youtube.com/post/Ugkxv2uotm3AI_tEuXQfqVRRs_kTbB3gEnXo?si=yWlac2P9g2OIzbBo
निवडणूक आयोगाकडे रास्त प्रश्न विचारले. १३ तारखेला रमेश चेन्नीथल यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भुमिका स्पष्ट केली होती. पक्षश्रेष्ठींकडून काहीही बोलले नाहीत. मी पक्षाच्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो. राहूल गांधी यांनी याआधी ही निवडणूक आयोगाच्या संदर्भात बोलले आहेत. कोणाला आघाडीत घ्यायचं नाही यावर दिल्लीत निर्णय होईल. संजय राऊत इंडिया आघाडीचे नेते आहेत त्यांच्या सोबत बोलायला मला काहीही अडचण नाही. दिवाळीच्या शुभेच्छा ही मी त्यांना देईन, असंही सपकाळ म्हणालेत.
Clash Erupts Between Sanjay Raut and Harshvardhan Sapkal, Raut Files Complaint with Congress High Command
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा