विशेष प्रतिनिधी
नागपूर : CM Devendra Fadnavis प्रत्येक राज्यात आणि केंद्रात तेथील मंत्र्यांचे परफॉर्मन्स ऑडिट सतत सुरू असते. गुजरातमध्ये अडीच वर्ष झाल्यानंतर बदल झाले आहेत. महाराष्ट्रातही परफॉर्मन्स ऑडिट सुरू आहे. मंत्र्यांच्या कामगिरीवर आमचे लक्ष आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचा इशारा दिला आहे.CM Devendra Fadnavis
दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात अनौपचारिक गप्पांत बोलताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात सरकार येऊन फक्त एक वर्ष झाले आहे. मात्र मंत्र्यांना कामगिरी सुधारावी लागणार आहे.CM Devendra Fadnavis
आता बंदुकीचा नक्षलवाद संपल्यात जमा आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधून नक्षलवाद हद्दपार झाला आहे. मात्र झेन झी पिढीला भरकटवून तसेच त्यांची माथी भडकवून उद्रेक घडवून आणणारा शहरी नक्षलवाद हेच येणाऱ्या काळात खरं आव्हान असणार आहे. वेगवेगळ्या स्वरूपात ते घातक विचार पेरतात. शहरी नक्षलवादी संविधान मानत नाहीत, पण अराजकतावाद्यांना आम्ही पराजित करु, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.CM Devendra Fadnavis
नाशिक कुंभमेळा आयोजनाची तयारी सुरू झाली आहे. पण, प्रयागराज आणि नाशिक येथील कुंभमेळ्याची तुलना होऊ शकत नाही, असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले , प्रयागराजच्या तुलनेत नाशिकमध्ये जागा कमी आहे. प्रयागराजमध्ये १५ हजार हेक्टर जागा आहे. नाशिक आणि त्र्यंबक मिळून ५०० एकर जागा आहे. रामकुंडात २ हजार तर त्र्यंबकेश्वरमध्ये ५०० लोक एकावेळी स्नान करू शकतात. आम्हाला गर्दी आणि स्नानाचे नियोजन आणि व्यवस्थापन करायचे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ड्रीम प्रोजेक्टपैकी एक शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा बदलण्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने नागपूर ते गोवा शक्तिपीठ मार्गाचा आराखडा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधील विरोधानंतर मार्गात बदल अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
CM Devendra Fadnavis Warns Ministers: ‘Improve Performance, We Are Watching Closely’
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..



















