विशेष प्रतिनिधी
नागपूर : बीड जिल्हयातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. मात्र केवळ मंत्री धनंजय मुंडे किंवा संजय राठोड यांच्यावरच आरोप नाहीत, तर राज्य सरकारमधील ६५ टक्के मंत्री कलंकित आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे असून वेगवेगळ्या न्यायालयात खटले सुरू आहेत. महाराष्ट्रातील सरकार गुन्हेगारांचे सरकार आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. Nana Patole
पटोले म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळात ६५ टक्के मंत्री कलंकित आहेत. त्यांच्यावर खून, लैंगिक अत्याचार, आर्थिक गैरव्यवहार यासारखे गंभीर गुन्हे आहेत. अनेक मंत्र्यांविरुद्ध वेगवेगळ्या न्यायालयात खटले सुरू आहेत. यासंदर्भात संबंधित मंत्र्यांनी स्वत:च प्रतिज्ञापत्रात माहिती दिली आहे. त्यामुळे केवळ संजय राठोड किंवा धनंजय मुंडे यांचा प्रश्न नाही तर मंत्रिमंडळातील ६५ टक्के कलंकित मंत्र्यांची चर्चा झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करायला हवे.
कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढले पाहिजे. भाजप स्वत:ला ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवते. त्याप्रमाणे कृती करावी. अन्यथा भाजप हे गुन्हेगारी प्रवृत्ती असलेली ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे हे सिद्ध होईल, असेही पटोले म्हणाले.
महाराष्ट्रात दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. सोयाबीन, धान, तुर, कापूस, कांद्याला भाव नाही. महागाई वाढली आहे. विजेचे देयक वाढीव दिले जात आहेत. युवकाच्या हाताला रोजगार नाही. राज्यात २४ लाख ९२ हजार युवकांनी रोजगार मिळावा म्हणून अर्ज केले आहेत. यावर काही तोडगा काढण्यापेक्षा मंत्रीपदावर, पालकमंत्रीदावर वाद निर्माण करण्यात सरकार व्यस्त आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली.
Congress state president Nana Patole allegation
महत्वाच्या बातम्या