विशेष प्रतिनिधी
पुणे : Sahitya Sammelan सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक व प्रशासकीय सेवेमधून निवृत्त झालेले विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. परंतु या निवडीवर काही इतिहास अभ्यासक व काही साहित्यिक यांनी विरोध दर्शवला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त लिखाण करणारा माणूस संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी कसा निवडण्यात आला? असा सवाल करत इतिहास अभ्यासकांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. विश्वास पाटील यांच्या संभाजी या कादंबरीमधील लिखाणावर हा आक्षेप असल्याचं बोललं जातंय. Sahitya Sammelan
विश्वास पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना बदनाम करणारे लिखाण त्यांच्या संभाजी या कादंबरीत केले असल्याने त्यांना विरोध करण्यात येत आहे. याबाबत बोलतांना इतिहास अभ्यासक सुशांत उदवंत म्हणाले, ‘विश्वास पाटील यांनी त्यांच्या संभाजी या कादंबरीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल बदनामीकारक लिखाण केले आहे.’ तसेच, इतिहासाचा कोणताही आधार नसताना त्यांनी कादंबरीत चुकीच्या गोष्टी लिहिल्या असल्याचा देखील आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्यांनी अगोदर हे लिखाण मागे घ्यावे त्यानंतरच साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारावे, असे आवाहन त्यांना इतिहासकार सुशांत उदवंत यांनी केले आहे. Sahitya Sammelan
सोबतच, त्यांनी जर त्यांचे बदनामीकारक लिखाण मागे घेतले नाही तर या संदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यासह सांस्कृतिक मंत्रालय यांच्याकडे तक्रार करुन साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद रद्द करण्याची मागणी करू असा इशारा देखील इतिहासकार उदवंत यांनी दिला आहे.
संभाजी ग्रथांच्या दोन्ही आवृत्तीत चुकीचे लिखाण करण्यात आल्याचे दिसून येते. एखाद्या वादग्रस्त व्यक्तीला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देणे चुकीचे आहे. त्यामुळे आमच्या परीने आम्ही याला विरोध करत रहाणार आहे. याबाबत आधी आम्ही भूमिका मांडूनही त्यांनी दखल घेतली नाही. परंतु आता आक्रमकपणे आम्ही आमची भूमिका मांडणार असल्याचा इशारा देखील उदवंत यांनी दिला आहे. Sahitya Sammelan
Controversy over the presidency even before the start of the 99th Sahitya Sammelan
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!