विशेष प्रतिनिधी
मुंबई : बनावट प्रमाणपत्रामुले वादाच्या भोवऱ्यात सापडलेली निलंबित प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर यांना उच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा दिलासा दिला. प्रल्हाद कुमार चौहान अपहरण प्रकरणात न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या एकलपीठाने खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. Pooja Khedkar
याचवेळी न्यायालयाने खेडकर यांना पीडिताला ४ लाख रुपये भरपाई देण्याचे तसेच पोलीस कल्याण निधीला अतिरिक्त १ लाख रुपये देण्याचे निर्देश दिले.
काँक्रीट ट्रान्सपोर्ट व्यवसायाचे मालक विलास ढेंगरे यांच्या तक्रारीवरून सप्टेंबरमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलुंड ऐरोली मार्गावर ढेंगरे यांच्या ट्रान्झिट मिक्सर ट्रकची एका कारला धडक बसली. यावेळी कारची भरपाई दिली नाही म्हणूनकार चालक प्रफुल्ल साळुंखे आणि दिलीप खेडकर यांनी मिक्सर चालक प्रल्हाद कुमार चौहान याचे अपहरण करून औंध येथील बंगल्यात डांबून ठेवले होते. या घटनेचा अधिक तपास करताना रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून दिलीप खेडकर यांचे घर गाठले.
तेथे खेडकर यांच्या पत्नीने पोलिसांना घरात प्रवेश दिला नाही. तसेच पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले. रबाळे पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. बेलापूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
माजी सनदी अधिकारी असलेल्या दिलीप खेडकर यांना बेलापूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला. तेथे दिलासा नाकारल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अशोक मुंदारगी यांनी युक्तिवाद केला. त्यावर सरकारी पक्षाने बाजू मांडताना अटकपूर्व जामीन देण्यावर तीव्र आक्षेप घेतला. दोन्ही बाजूकडील सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
Court gives relief to Pooja Khedkar’s father, protects him from arrest
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा