विशेष प्रतिनिधी
मुंबई : एका बाजूला उद्धव ठाकरे पक्ष बांधणीसाठी राज्याचा दौरा करण्याच्या तयारीत असताना पक्षाला सल्ला देणाऱ्या प्रवक्त्याची हकालपट्टी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी मातोश्रीवर केलेली टीका ताण भोवली असून हकालपट्टीला सामोरे जावे लागले आहे.
मातोश्री आणि सेना भवनावर विनायक राऊत, अरविंद सावंत, संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर या सारख्या नेत्यांनी ताबा मिळवला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराजयाची जबाबदारी निश्चित करून जनाधार असलेल्या नेत्यांना पक्ष सोडण्यासाठी लावणाऱ्या या नेत्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली होती.
किशोर तिवारी यांनी पक्षाला आरसा दाखविला . मात्र त्यामुळे त्यांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या संबंधात किशोर तिवारी यांनी देखील पक्षाच्या या निर्णयावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
किशोर तिवारी यावर म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंना शिवसेना मध्ये विनायक राऊत अरविंद सावंत संजय राऊत मिलिंद नार्वेकर सारख्या नेत्यांनी मातोश्री व सेना भवनावर केलेल्या ताबा मिळविला आहे. विधान सभा निवडणुकी मध्ये पराजय करण्यात जबाबदारी निश्चित न करीत जनाधार असलेल्या नेत्यांना पक्ष सोडण्यास लावणाऱ्या पोटभरू कावेबाज नेत्यांना हकालपट्टी करा ही मागणी आपण केली होती.
जो माणूस सत्य बोलण्याचे धाडस करतो, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मागील पाच वर्षांपासून सतत राहून भाजपच्या सर्व प्रवक्त्या मंडळींनी त्यांची जागा दाखविणाऱ्या एका चळवळीच्या कार्यकर्त्याला साधी सूचना न देता सरळ हकालपट्टी किती योग्य आहे.