Ravikant Tupkar’ : आमदाराऐवजी दोन-चार मंत्र्यांना कापा, पण मागे हटू नका, रविकांत तुपकर यांचे वादग्रस्त आवाहन

Ravikant Tupkar’ : आमदाराऐवजी दोन-चार मंत्र्यांना कापा, पण मागे हटू नका, रविकांत तुपकर यांचे वादग्रस्त आवाहन

Ravikant Tupkar'

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Ravikant Tupkar आम्ही भीक मागायला आलेलो नाही; कर्जमाफी हा आमचा नैतिक हक्क आहे. त्यामुळे आमदाराऐवजी दोन-चार मंत्र्यांना कापा, पण मागे हटू नका, असे वादग्रस्त आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे. Ravikant Tupkar

शेतकरी कर्जमाफी आणि वाढत्या आर्थिक अडचणींविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज नागपुरात भव्य मोर्चा काढण्यात आला. सरकारने दिलेल्या अल्टिमेटमची मुदत संपताच निघालेल्या या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर संघटनांचे हजारो शेतकरी सहभागी झाले. बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात नागपूरमध्ये काढलेल्या मोर्चात रविकांत तुपकर बोलत होते. शेतकऱ्यांनो आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा, असे विधान काही दिवसांपूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी केले होते. आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी त्यापुढेही जाऊन वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले, नेपाळमध्ये जसे मंत्र्यांना तुडवून तुडवून हाणले, नेपाळचे मंत्री देश सोडून पळून गेले. लक्षात ठेवा. मी तर बच्चू भाऊंना म्हणेन, नागपूरनंतरचा चौथा टप्पा मुंबईचा ठेवा. Ravikant Tupkar



हरामखोरांना मुंबई आणि महाराष्ट्रातून जावे लागले पाहिजे. त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. सरकार आपल्याशी नीट वागणार नसेल तर सरकारच्या उरावर बसावे लागेल. माझ्यावर शंभर केसेस आहेत. तुम्ही म्हणाल, खिसे कापतो की काय तर नाही गेल्या 22 वर्षात अनेकांचे माज उतरवण्याचे काम केले आहे. आम्ही काही फक्त बोलबच्चन नाही. आम्ही जे बोलतो ते करतो. लोक म्हणतात की शेतकऱ्यांचे मजबूत संघटन होऊ शकत नाही. पण तुम्ही दाखवून दिले की, शेतकरीही एकत्र येऊ शकतात. इथून पुढे आत्महत्या करायच्या नाहीत. कितीही संकटे आली तरी जीवन संपवायचे नाही. बच्चू भाऊंनी सांगितले की, आमदाराला कापा. मी त्या पुढे जाऊन सांगतो की दोन-चार मंत्र्यांना कापा. पण आता मागे हटायचे नाही. मरायचं तर आजिबात नाही.

रविकांत तुपकर म्हणाले, महाराष्ट्रातील आम्ही सर्व शेतकरी नेते एकत्र आहोत. ही एक अभूतपूर्व गोष्ट या ठिकाणी घडताना दिसत आहे. आम्ही वेगवेगळ्या भागात लढतो. पण शेतकऱ्यांची वज्रमूठ एका ठिकाणी आणण्याचे काम बच्चू कडू यांनी केलं आहे. हा मोर्चा अशा ठिकाणी आणला आहे की, समृद्धी महामार्ग बंद, हैदराबाद-जबलपूर मार्ग बंद सगळे रस्ते बंद केले आहेत. बच्चू कडू यांनी फार सर्वेक्षण केलेले आहे. कारण इथून एकही गाडी पास होणार नाही. सरकारचे नाक दाबल्याशिवाय सरकारचे तोंड उघडत नाही.
आज सोयाबीन साडेतीन ते चार हजार रुपयांनी विकले जात आहे. सोयाबीनचे एक क्विंटल उत्पादनासाठी साडे सात हजार रुपये खर्च येतो आणि बाजारात तीन ते साडेतीन हजार रुपये भाव मिळत आहे. कापसाची देखील तीच अवस्था आहे. केंद्र सरकारने सोयाबीन निर्यात केली नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सोयाबीनची निर्यात केल्यास त्याला 8000 भाव मिळेल. कापूस आयातीपेक्षा कापूस निर्यात करा. आमच्यामुळे आमच्यावर कर्ज झाले नाही तर तुमच्या धोरणांमुळे आम्ही कर्जबाजारी झालो आहे. तुम्ही कापूस, ऊस शेतकऱ्यांना लुटला आणि आम्ही कर्जबाजारी झालो, असा आरोप रविकांत तुपकर यांनी सरकारवर केला.

जातीचा मोर्चा निघाला की सरकार आंदोलनस्थळी चर्चेसाठी येते. मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला तर तुम्ही इथे का येऊ शकत नाहीत? हा आमचा सरकारला सवाल आहे. आम्ही तुमच्या दारात येणार नाहीत. तुम्हाला चर्चा करायला शेतकऱ्यांच्या दारात नागपूरच्या वेशीवर यावे लागेल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सांगतात की, बैठक बोलावली होती पण चर्चेला आले नाहीत. सरकारने निवडणुकीच्या आधी कर्जमाफीची घोषणा केली होती. आता त्याला एक वर्ष झाले तरी त्यावर काहीच बोलत नाहीत. आम्ही भीक मागायला आलो नाहीत. सोयाबीनला भाव देता येत नाही. सोयाबीन निर्यात होत नाही. परदेशात निर्यात करा. सोयाबीनचे योग्य भाव मिळतील. कापसाची आयात करण्यापेक्षा निर्यात करा. कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे”, असं तुपकर म्हणाले.

युद्धामध्ये काही झाल्यास नेत्याचा आदेश शिरसावंद्य असतो. त्यामुळे इथले नेते जो काही आदेश देतील, त्याची अंमलबजावणी करा. घरी फोन करून सांगा, कर्जमाफी केल्याशिवाय माघारी येणार नाही. त्यामुळे आता सरकार कसे चर्चेला येत नाही ते आपण पाहूच. शेतकऱ्यांची एकजुट झालेली वज्रमुठ सोडू नका. इंग्रज माजले म्हणून महात्मा गांधी, भगतसिंहांचा जन्म झाला. अण्णा हजारेंनी आंदोलन केल्याने केजरीवाल दोन-तीन वेळा मुख्यमंत्री झाले. आता राज्यातील सरकार माजलं म्हणून इथले नेते जन्माला आले आहेत असे समजा, असे रविकांत तुपकर म्हणाले.

Cut two or four ministers instead of MLAs, but don’t back down, Ravikant Tupkar’s controversial appeal

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023