विशेष प्रतिनिधी
गडचिरोली: Prakash alias तब्बल 45 वर्षे माओवादी संघटनेत कार्यरत असलेला वरिष्ठ नेता आणि तेलंगणा राज्य समिती सदस्य बंडी प्रकाश उर्फ प्रभात यांनी 2 तेलंगणा पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण पार पडले. विविध राज्यांमध्ये त्याच्यावर मिळून सुमारे दीड कोटी रुपयांचे बक्षीस घोषित होते.Prakash alias
प्रकाश हे चळवळीतील जुने आणि प्रभावशाली नाव मानले जात होते. आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यांतील विविध व्यावसायिक स्त्रोतांकडून संघटनेसाठी निधी उभारण्याची जबाबदारी त्यांनी वर्षानुवर्षे सांभाळली. शरण येण्यापूर्वी ते ‘नॅशनल पार्क एरिया ऑर्गनायझर’ म्हणून काम करीत होते. भूमिगत होण्यापूर्वी ‘सिंगरेनी वर्कर्स युनियन’चे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले होते. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे निधी, भरती आणि स्थानिक संपर्क यामध्ये सातत्याने प्रभाव दिसत होता, अशी सुरक्षा यंत्रणांमध्ये नोंद आहे.Prakash alias
काही दिवसांपूर्वीच गडचिरोलीत माओवादींचे सर्वोच्च नेता म्हणून ओळखले जाणारे मल्लोझुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती यांनी सुमारे 60 सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. 17 ऑक्टोबर रोजी छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भूपेशसह 210 नक्षलवाद्यांनी संविधान स्वीकारून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी कांकेर जिल्ह्यात 13 महिलांसह 21 वरिष्ठ कॅडरने अत्याधुनिक शस्त्रे खाली ठेवली. या मालिकेत आता बंडी प्रकाश यांचे आत्मसमर्पण विशेष ठरले आहे.Prakash alias
पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, प्रकाश यांचे शरण येणे तेलंगणातील नक्षल चळवळीच्या भवितव्यासाठी निर्णायक वळण ठरू शकते. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा या तिन्ही राज्यांत होत असलेल्या सलग आत्मसमर्पणांमुळे जंगली पट्ट्यातील नक्षल नेटवर्कची पकड कमकुवत होत आहे. संयुक्त ऑपरेशन्स, तंत्रज्ञानाधारित नकाशे आणि गावपातळीवरील माहिती संकलन यामुळे पाेलीसांचा दबाव वाढला आहे. स्थानिक पायाभूत सुविधा, रस्ते आणि नेटवर्क कव्हरेज वाढल्याने नक्षल पथकांचे हालचाल मार्ग कमी सुरक्षित राहिले आहेत.
केंद्र व राज्य सरकारने संयुक्त माेहीम राबवून नक्षलवादाविरुध्द उपाययाेजना सुरू केल्या आहेत. यामध्ये नक्षलवाद्यांची सततची कोंडी आणि पुरवठा साखळीवर अंकुश ठेवण्यात आला. नक्षलवादी चळवळीतील वरिष्ठ नेत्यांना अटक झाली किंवा मृत्यू झाले. अनेकांनी आत्मसमर्पण केले. यामुळे संघटना कमकुवत हाेत गेली. राज्य सरकारांच्या पुनर्वसन धोरणांमधून मिळणारी कायदेशीर संरक्षणाची तरतूद, आर्थिक मदत, घरकुल मदत, कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योजकता सहाय्य यामुळे नक्षलवादी चळवळीत गुंतलेल्या तरुणांना चांगले भविष्य दिसू लागले.
Decisive step towards eradication of Naxalism: Maoist leader Bandi Prakash alias Prabhat surrenders before Telangana police
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















