विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाने सरकारकडे ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी, सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. Shashikant Shinde
राज्यातील मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नद्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणची शेती पाण्याखाली गेली आहे. जनावरेही वाहून गेल्याचे प्रकार घडले आहेत.
शशिकांत शिंदे म्हणाले, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होत आहे. बळीराजाने मोठ्या आशेने शेतात पीक पिकवले होते. मात्र सतत सुरू असलेल्या पावसामुळे हाती आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्याचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहे. आता तरी राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का?’असा सवाल शशिकांत शिंदे यांनी केला.
राज्य सरकारकडे पैसे नसल्यामुळे ते आता शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेत नाही. चुकीची कामे घेऊन सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारलेला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडे पैसे नाही. हे सरकार शेतकऱ्यांचे नसून उद्योगपतींचे आहे का?’
अनेक ठिकाणी अद्याप नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, आणि ज्या ठिकाणी झाले आहेत, तिथेही मदत पोहोचलेली नाही. त्यामुळे आता तरी सरकारने जागे व्हावे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली.
शशिकांत शिंदे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही महायुती सरकारला इशारा दिला. महायुती सरकारची कर्जमाफीची घोषणा होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, वेळ आली तर कर्जमाफी करू. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरसकट कर्जमाफी करता येत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, जर सरकारने लवकरच सरसकट कर्जमाफीची घोषणा केली नाही, तर आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभारू, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
Declaring a wet drought in the state, demands NCP Pawar faction Shashikant Shinde
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला