Pravin Gaikwad : दीपक काटे हा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा माणूस, मकोका लावण्याची प्रवीण गायकवाड यांची मागणी

Pravin Gaikwad : दीपक काटे हा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा माणूस, मकोका लावण्याची प्रवीण गायकवाड यांची मागणी

Deepak kate Pravin Gaikwad

विशेष प्रतिनिधी

पुणे : अक्कलकोट येथे आपल्यावर हल्ला केलेला दीपक काटे हा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा माणूस असल्याचा आरोप करत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता मकोका लावण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी केली आहे.

गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर दोन दिवसांपूवी दीपक काटे आणि त्याच्या सोबतच्या काही जणांनी हल्ला करत काळे वंगण फासले होते. यासंदर्भात पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना गायकवाड म्हणाले, काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे हे अनेकदा समोर आले आहे. भावाच्या खूनाच्या गुन्ह्यात तो काही दिवस कारागृहात होता. चंद्रशेखर बावनकुळे काटेंना म्हणतात की तुमच्या आम्हाला अभिमान आहे, देवेंद्र फडणवीस आणि मी तुमच्या मागे आहोत. माझ्यावर जो हल्ला झाला त्यावेळी माझी पत्नी सोबत होती. जन्मजेयराजे भोसलेंच्या सत्कारासाठी त्यांनी विनंती केली म्हणून मी तिथे गेलो होतो. माझ्या अंगावर विषारी वंगण तेल टाकण्यात आले. माझ्या सुरक्षिततेसाठी मला गाडीत बसवण्यात आले. त्यावेळी गुन्हेगार असलेल्या दीपक काटेने माझ्यावर हल्ला केला. त्यात आमच्या कार्यकर्त्यांनी सावरले आणि तिथून मला बाहेर काढले.


मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती


प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) म्हणाले की, माझ्यावर हल्ला झाला त्यावेळी जन्मजेयराजे भोसलेंचा सत्कार झाला तिथे साधे या घटनेचा निषेध नोंदवला गेला नाही. कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांकडून पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली नाही. या परिस्थितीमध्ये आम्ही सोलापूरला पोहचलो. हे सर्व घडत असताना भाजपच्या पीआर कंपनीने व्हिडिओ रेकॉर्ड करत बातमी व्हायरल केली याचा अर्थ काय घ्यायचा?

प्रवीण गायकवाड म्हणाले की, दीपक काटे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांनी स्वत:च्या भावाची हत्या केली होती. या प्रकरणी त्यांनी शिक्षा भोगली आहे. खंडणी पासून अनेक गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत, असे असताना त्यांना भाजपच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस पद देण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असताना दीपक काटे त्यांच्यासोबत अनेकवेळा दिसले आहेत. 2025 मध्ये त्यांच्याकडे 2 पिस्तुल आणि 28 काडतुसं सापडले म्हणून त्यांना अटक करण्यात आली. हे लोहगाव विमानतळावरचे प्रकरण आहे. यावेळी त्यांच्याकडे 2 पिस्तुल आणि 28 काडतुसं सापडली. यानंतर न्यायालयाने म्हटले आहे की कोणतेही गुन्हेगारी पार्श्वभूमी निदर्शनास आलेली नाही. भावाच्या खुनाच्या गुन्ह्यात ज्याने शिक्षा भोगली आहे, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही असे सांगण्यात आले.

प्रवीण गायकवाड म्हणाले की, दीपक काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी जर त्यावेळी समोर आणली नसती तर तो आज जामीनावर सुटला नसता . ज्या आरोपीला मकोका लावणं गरजेचे आहे, त्यांना मुक्त सोडले गेल्यानंतर त्यांच्यावर एक जबाबदारी देण्यात आली. यानंतर प्रवीण गायकवाड यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची एक व्हिडिओ क्लिप दाखवली यात ते म्हणताय की, काटे जी आपण चांगले काम कराल जेव्हा तुम्हाला माझी गरज वाटेत तेव्हा मी, देवेंद्र फडणवीस, हर्षवर्धन पाटील, पडळकर हे सर्व तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही ज्या अपेक्षेने आणि आशेने जी लढाई जिंकण्याकरता अन्याय दूर करण्याकरता भाजपमध्ये आला आहात त्याला वाचा फोडल्या शिवाय मी राहणार नाही.

प्रवीण गायकवाड म्हणाले की, मला भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे. कारण त्यांची आणि आमची वैचारिक लढाई आहे. वैचारिक लढाई लढण्याची तयारी असेल तर आम्ही तयार आहोत. हा एका षडयंत्राचा भाग आहे. आमच्या संघटनेचे नाव बदलण्याचा विषय आहे. सचिन कांबळे यांनी छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाची संघटना रजिस्टर केली आहे. त्यामुळे आमच्या संघटनेचे नाव बदल करता येत नाही. हे जर त्यांनी मला बोलले असते तर सांगितले असते.

प्रवीण गायकवाड म्हणाले की, चळवळीतील कार्यकर्ते संपवण्याची एक योजना यांनी तयार केली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचा बंदोबस्त करावा लागतो. कारण हे नेत्यासारखे पक्ष बदलत नाही. शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यावर त्यांनी मारेकरी पाठवले. तर महात्मा गांधींची हत्या केली हा त्यांचा वारसा आहे. आता गोपाळ गोडसेंचे नाटकं दाखवत आहे. एक पक्ष एक संघटना एक विचार याला आम्ही अडसर येत असल्याने हा हल्ला झाला. कटेवर काही कारवाई होणार नाही, कारण हे सर्व सरकार पुरस्कृत आहे. या प्रकरणाचा तपास अधिकारी चंद्रशेखर बावनकुळेंचा नातेवाईक आहेत. त्यामुळे कारवाई होणार नाही. पुरोगामी लोकांचा काटा काढा असा आदेश संघाकडून देण्यात आला आहे यातून हे सर्व काही सुरू आहे.

Deepak Kate is Revenue Minister Chandrashekhar Bawankule’s man, Pravin Gaikwad demands implementation of MCOCA

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023