विशेष प्रतिनिधी
अक्कलकोट : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ला प्रकरणात प्रमुख आरोपी असलेला दीपक काटे याच्यासह त्याच्या एका साथीदाराला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही अटी शर्ती तसेच 20 हजार दंड आकारला आहे. या प्रकरणात दीपक काटेसह 7 जणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश एम ए कल्याणकर यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.
अक्कलकोट येथे रविवारी दुपारच्या सुमारास प्रवीण गायकवाड यांच्यावर काळे वांगं फेकत धक्का बुक्की करण्यात आली होती. या सर्व झटापटीत गाड्यांची तोडफोड झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला होता. दीपक काटे याला भाजपच्या नेत्यांचे खास करून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पाठबळ असल्याचेही काही पुरावे प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दाखवले होते. न्यायालयाने जामीन देताना आरोपींनी पुढील तपासासाठी सहकार्य करावे अशा अटी शर्ती घातल्या आहेत, तसेच दर 8 दिवसाला दीपक काटे व दुसरा आरोपी भुवनेश्वर शिरगिरे यांनी अक्कलकोट किंवा सोलापूर येथे पोलीस स्टेशनला हजेरी लावावी असही सांगण्यात आले आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावरील केलेल्या हल्ल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला हेोता. अजुनही अनेक ठिकाणी या हल्ल्याविरोधात निदर्शने हेखील करण्यात केली जात असून संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे.
Deepak Kate, the main accused in the attack on Praveen Gaikwad, gets bail
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला