मुख्यमंत्र्यांनी “शक्तिपीठ”चा अट्टाहास सोडावा, सतेज पाटील यांची मागणी, कृती समितीचा आंदोलनाचा इशारा

मुख्यमंत्र्यांनी “शक्तिपीठ”चा अट्टाहास सोडावा, सतेज पाटील यांची मागणी, कृती समितीचा आंदोलनाचा इशारा

विशेष प्रतिनिधी

गडहिंग्लज : बारा जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांचा विरोध असणारा शक्तिपीठ महामार्ग रद्दचा करावा, हीच आपली मागणी आहे. त्याच्या संरेखनात बदल केला तरीदेखील आपला विरोध कायम राहील. मुख्यमंत्र्यांनी “शक्तिपीठ”चा अट्टाहास सोडावा. त्याऐवजी ८६ हजार कोटींतून राज्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरावेत. लोकांचे कंबरडे तरी शाबूत राहिल, अशी मागणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली. Satej Patil

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते गडहिंग्लजला आले होते.दि. ४ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग येथे शक्तिपीठ विरोधी परिषद आयोजित केली आहे. त्याला माजी खासदार राजू शेट्टींसह इंडिया आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.

राज्यभरातील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपला अट्टाहास सोडावा,आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करताना पाटील म्हणाले, नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाचे संरेखन बदलून तो चंदगडमार्गे नेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. त्याला आजरा, चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी सर्व शक्तिनिशी विरोध करतील.



सरकारचा हा जनविरोधी, शेतकरी विरोधी, पर्यावरणाला बाधा आणणारा महामार्ग नक्कीच हाणून पाडू, असा विश्वास शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक तथा श्रमिक मुक्ती दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी व्यक्त केला आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मागणीनुसार हा मार्ग चंदगडमार्गे नेण्यासाठी संरेखन बदलण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. परंतु, महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील लोकमत Shorts शक्तिपीठ महामार्ग विरोधातील शेतकऱ्यांच्या संघर्षातदेखील आम्ही यापुढेही आघाडीवर राहणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

कॉ. देसाई म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाची गरज नसताना तो शेतकऱ्यांच्या माध्यावर मारला जात आहे. या महामार्गामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होणार असून, महापुरासारख्या महाभयानक संकटाला वारंवार सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळेच या महामार्गाला आमचा तीव्र विरोध आहे. यापूर्वी आजरा येथे भर पावसात झालेल्या महामोर्चाने लोकांच्या मनात असलेला राग यापूर्वी दाखवून दिला आहे. गडहिंग्लज येथेही रास्ता रोकोद्वारे विरोध केला आहे. लवकरच शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची व्यापक बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा निश्चि लोकमत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Demands Satej Patil; Action Committee Warns of Agitation

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023