विशेष प्रतिनिधी
ठाणे : Eknath Shinde गडचिरोलीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कारवाईत २७ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला असून त्यात कुख्यात नक्षलवादी केशवराव उर्फ बसवराजू याचाही समावेश होता. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मजबूत नेतृत्वाखाली देशातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला असून, २०२६ पर्यंत संपूर्णपणे नक्षलवादाचा नायनाट केला जाईल.”Eknath Shinde
शिंदे म्हणाले की, “भाजप सरकारच्या आधी छत्तीसगडसारख्या भागांमध्ये नक्षलवाद्यांविरोधात ठोस कारवाई होत नव्हती. मात्र अमित शहा यांच्या कार्यकाळात या भागात विशेष लक्ष दिले गेले. सशस्त्र पोलीस दल प्रभावीपणे नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करत आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही मोहीम निश्चितच यशस्वी होईल.”
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अबूधाबी दौऱ्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांच्या भूमिकेत सकारात्मकता दिसून आली. स्थानिक प्रतिनिधी व नागरिकांनी भारताच्या कारवाईचे खुलेपणाने समर्थन केले आणि स्पष्ट सांगितले की पाकिस्तानला कोणताही पाठिंबा दिला जाणार नाही. अशा महत्त्वाच्या दौऱ्याची चेष्टा करणे हे अत्यंत खेदजनक आहे.
Deputy Chief Minister Eknath Shinde believes that Naxalism will end by 2026.
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर