विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या समग्र विकासात आता केवळ उद्योग, शेती किंवा तंत्रज्ञानच नव्हे तर मनोरंजन उद्योगाचाही निर्णायक वाटा असणार असल्याचा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट – WAVES 2025’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या शिखर परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले.या वेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, रेल्वे व माहिती-प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्यासह देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईतील ५०० एकर परिसरात असलेल्या चित्रनगरीत विशेषतः अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्स क्षेत्रासाठी १२० एकर क्षेत्रावर एक स्वतंत्र मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट सिटी उभारली जाणार आहे. हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात उतरणार असून महाराष्ट्राला क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा केंद्रबिंदू बनवण्याचा राज्याचा निर्धार आहे.
भारत आता केवळ आर्थिक महासत्ता न राहता, क्रिएटिव्ह उद्योगातही जागतिक नेतृत्व करण्याच्या तयारीत आहे. ‘वावेझ 2025’ परिषदेतून भारताने आपले सर्जनशील सामर्थ्य जगासमोर ठामपणे मांडले आहे. महाराष्ट्रामध्ये माहिती तंत्रज्ञान, कौशल्य, शिक्षण व कार्यक्षमता या क्षेत्रांमध्ये मोठा आत्मविश्वास आहे, असे ते म्हणाले.
‘मेक इन इंडिया’नंतर आता ‘क्रिएट इन महाराष्ट्र’ ही नवी दिशा आहे, असे सांगत फडणवीस यांनी राज्य सरकारकडून या क्षेत्रातील स्टार्टअप्स, स्टुडिओज आणि नवउद्योजकांना आवश्यक ती धोरणात्मक व वित्तीय मदत दिली जाईल, अशी ग्वाहीही दिली.
Devendra Fadnavis believes that the entertainment industry has a major role in the development of Maharashtra.
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती