विशेष प्रतिनिधी
फलटण : डॉक्टर भगिनीच्या आत्महत्या प्रकरणात रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांचे नाव घुसवण्याचा प्रयत्न झाला. प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणात मला थोडी जरी शंका असती तर हा कार्यक्रम रद्द करुन येथे आलो नसतो, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना क्लीन चिट दिली आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी २३ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. फलटण येथील पोलीस अधिकाऱ्यांकडून महिला डॉक्टरवर बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा आरोप असलेले भाजपचे दोन्ही नेते उपस्थित आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर भाषणातून क्लीनचीट दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी रणजीतसिंह यांना क्लीनचीट देताना मी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, “मी याठिकाणी येऊ नये यासाठी अनेक प्रयत्न झाले. परवा आमची बहीण डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या करताना त्यांच्या आत्महत्येचे कारण आपल्या हातावर लिहून ठेवले. पोलिसांनी तत्काळ त्या आरोपींना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर त्या घटनेतील सत्य बाहेर येत आहे. कुठल्याही परिस्थितीत या भगिनीला न्याय मिळवून देणार आहे. अशा बाबतीमध्ये मी पक्ष, व्यक्ती, राजकारण पाहात नाही, जिथे माझ्या भगिनीचा विषय आहे, तिथे मी कॉम्परमाईज करत नाही. मात्र प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम कोणी करत असेल, प्रत्येक गोष्टीत राजकारण करत असेल तर ते सहन करणाऱ्यांपैकी मी नाही. त्याला उत्तर देण्याऱ्यांपैकी मी आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे या तरूणीने 23 ऑक्टोबर रोजी एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 24 ऑक्टोबरला उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. डॉक्टर महिलेने तिच्या हातावर एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. “माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला,” याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर याच्यावर मानसिक व शारीरिक त्रास, तसेच लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 25 ऑक्टोबरला प्रशांत बनकरला पोलिसांनी अटक केली तर त्याच दिवशी रात्री उशिरा गोपाळ बदने हा पोलिसांना शरण आला आहे.
Clean Chit to Ranjitsinh Naik Nimbalkar from CM in Woman Doctor Suicide Case Allegation
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा



















