आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे पप्पू बनू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टाेला

आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे पप्पू बनू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टाेला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बाेगस मतदानाचा आराेप करणारे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाेरदार हल्लाबाेल केला. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे पप्पू बनू नये असा टाेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे पप्पू बनू नये, असा टोला लगावताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरे यांनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे, असे प्रदर्शन करू नये, अशी माझी अपेक्षा होती. कारण मला असे वाटत नाही की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत. पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून उगीच इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाड आणि चुहा भी नहीं निकला, अशा पद्धतीचे वक्तव्य करायचे. दुर्दैवाने तेच काल आदित्य ठाकरेंनी केले. त्याची उत्तरे निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी बनू नये.

काही लोकांना सवयच लागली आहे रोज खोटे डॉक्युमेंट दाखवण्याची. आता आजच त्यांनी दाखवलेले पॅन कार्ड खोटे निघाले. ते आता माफी मागणार आहेत का? रोज खोटे डॉक्युमेंट आपल्याच घरी तयार करायचे आणि पत्रकार परिषद घ्यायची. आम्हाला प्रश्न विचारण्याऐवजी त्यांना प्रश्न विचारा. खोटे डॉक्युमेंट महाराष्ट्राला दाखवल्या प्रकरणी ते माफी मागणार आहेत का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारच्या वतीने जे शेतकऱ्यांना रिलीफ पॅकेज देण्यात येणार आहे त्याचा आढावा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आतापर्यंत 8 हजार कोटी रिलीज करण्यात आले आहेत. जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोहोचले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11 हजार कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. हे पैसे देखील पुढील 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे खात्यात पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



सध्या शेतमालाच्या खरेदीचा विषय आलेला आहे. या संदर्भात आपण सगळीकडे नोंदणी सुरू करत आहोत. नोंदणीचे कारण यासाठी की पूर्वी नोंदणी केली नसेल तर व्यापारीच शेतकऱ्यांचा माल कमी पैशात विकत घेऊन सरकारला जास्त पैशांनी विकायचे. म्हणून आता आपण शेतकऱ्यांची नोंदणी करतो आणि मग त्यांचा माल खरेदी करतो. शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी नोंदणी करावी. व्यापारी हमी भावाप्रमाणे तुमचा माल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाऱ्याला विका. पण हमीभवापेक्षा कमी भाव व्यापारी देत असतील तर नोंदणी करून सरकारच्या खरेदी केंद्रांवर आपला माल टाका, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले, सोलापूर, तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. जवळपास 3 हजार 295 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. 50 टक्के पैसे राज्य सरकार आणि 50 टक्के केंद्र सरकार देणार आहे. यामुळे धाराशिव जिल्ह्याबराेबर धार्मिक पर्यटनालाही फायदा हाेणार आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला मारले जात आहे, अशा प्रकारचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोक विनाकारण आम्ही शहीद होत आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. वसंतदादा शुगरइन्स्टीट्युटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही. याठिकाणी ज्या वेळेस आपली गाळप हंगामची बैठक झाली होती, तेव्हा वेगवेगळे पैसे जे आपण कापून घेतो त्याचा विनियोग नेमका काय होतो याची माहिती घेतली पाहिजे, असे सर्वसमक्ष ठरले. त्यात आपण वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटसाठी वर्षानुवर्ष 1 रुपया कापून घेतो, त्यामुळे जसे इतरांनी या पैशांचे काय केले याची माहिती मागितली, तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी वसंतदादा साखर इन्स्टीट्युटला मागितली आहे. त्या बैठकीत वसंतदादा इन्स्टीट्युटचे पदाधिकारी पण होते, कारखानदार सुद्धा होते. त्यामुळे विनाकारण चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

Devendra Fadnavis jabs Aditya Thackeray

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023