Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले हिंदुत्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा त्याग केल्याने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले हिंदुत्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा त्याग केल्याने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

Nagpur News: उद्धव ठाकरेंनी गद्दारी केल्यामुळे आपले सरकार गेले. मात्र अडीच वर्षांनी 2022 मध्ये पुन्हा सरकार आले. तेव्हा भाजपच्या सर्वाधिक जागा असतानाही ज्यांनी आपल्यासाठी आणि हिंदुत्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा त्याग केला, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाचा 45वा वर्धापन दिन रविवारी साजरा झाला. या निमित्ताने आयोजित ऑनलाईन कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद का देण्यात आले, याचे उत्तर दिले. महाराष्ट्रामध्ये भाजप सर्वप्रथम 1995 मध्ये शिवसेनेसोबत युतीत सत्तेत आली. महाराष्ट्र भाजपबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 1995 नंतर भाजप संघर्ष करत राहिली. त्यानंतर 15 वर्षांनी 2014 मध्ये पुन्हा सरकारमध्ये आलो. पाच वर्षे आपण उत्तम काम केले. त्यानंतर लोकांनी पुन्हा आपल्याला निवडून दिले. मात्र, उध्दव ठाकरे यांनी गद्दारी केली असे त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या पक्षाचा जन्म जनसंघाच्या रुपाने 1952 मध्ये झाला. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. विविध पक्षांचे कडबोळे असलेले हे सरकार कम्युनिस्टांच्या आणि इतरांमुळे जनता सरकार कोसळले. जनता पक्षा फुटला, त्यानंतर 1980 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा आपण देशात सरकारमध्ये आहोत. देशातील अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. परंतु हा केवळ कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे लोकशाहीला महत्त्व आहे, त्यामुळे भाजपचा चहावाला पंतप्रधान झाला, असे फडणवीस म्हणाले.

भारतीय जनता पक्ष 45 वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात 2014 मध्ये प्रथमच स्वबळावर सत्तेत आला असे सांगत फडणवीस म्हणाले की, आज देशात 16 राज्यात भाजप स्वबळावर सत्तेत आहे. तर 21 राज्यांमध्ये मित्रपक्षांच्या सहकार्याने सत्तेत आहे. असे असतानाही पक्षाने लोकशाही सोडली नाही, घराणेशाही कधी अंगीकारली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला. ते म्हणाले की, हा पक्ष कायम कार्यकर्त्यांचा पक्ष राहिला. त्यामुळेच एक चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो.

Devendra Fadnavis said that he sacrificed Uddhav Thackeray to preserve Hindutva and gave Eknath Shinde the post of Chief Minister

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023