विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: मुंबई आणि पुणे मेट्रो, बुलेट ट्रेनला हजारो कोटी रुपयांचा निधी यासह केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला मोठा निधी मिळाला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकदेवारीसह स्पष्ट केले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर केला. विरोधी पक्षातील नेत्यांनी मात्र या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. काँग्रेसचे नेत्यांनी अर्थसंकल्पात महाराष्ट्राची निराशा करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी का देण्याच आलं? याची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याल अर्थसंकल्पात काय आलं याची माहिती देण्यात आली आहे.
भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र!
(टिप : ही केवळ प्राथमिक माहिती. विविध मंत्रालयांची तरतूद तसेच रेल्वेची आकडेवारी सविस्तरपणे येईल.)– मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी
– पुणे मेट्रो : 699.13 कोटी
– एमयुटीपी : 511.48 कोटी
– एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी
-…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 1, 2025
मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी
पुणे मेट्रो : 699.13 कोटी
एमयुटीपी : 511.48 कोटी
एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे : 4004.31 कोटी
सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 1094.58 कोटी
महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प: 683.51 कोटी
महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क : 596.57 कोटी
नागनदी सुधार प्रकल्प : 295.64 कोटी
मुळा-मुठा नदी संवर्धन : 229.94 कोटी
ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प : 186.44 कोटी
Devendra Fadnavis said with statistics what did Maharashtra get in the budget?
महत्वाच्या बातम्या
- Nirmala Sitharaman’ : कॅन्सरवरील औषधे, टीव्ही, मोबाईल आणि इलेक्ट्रिक कार होणार स्वस्त
- Modi Govt : मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना आजपर्यंतची सर्वात मोठी भेट, एक लोक कोटी तोटा सहन करून १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
- Devendra Fadnavis भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक
- नामदेव शास्त्री टीकेचीही तयारी ठेवा, मनसे नेते प्रकाश महाजन यांचा धनंजय मुंडे भेटीवरून इशारा