विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता नगर विकास खात्याच्या मोठ्या रकमेच्या निधी वितरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.Devendra Fadnavis
एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीनुसार आणि सढळ हाताने पैसे खर्च करण्याच्या सवयीला अंकुश लावण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नगर विकास आणि ग्राम विकास ही दोन खाती महत्त्वाची मानली जातात. यापैकी ग्रामविकास खाते हे भारतीय जनता पक्षाकडेच आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
नगर विकास खाते हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. नगर विकास खात्याच्या माध्यमातूनच विविध योजनांचा पैसा हा आमदार आणि महानगरपालिका, नगर परिषद मधील नगरसेवकांना पुरवला जातो. मात्र अलीकडच्या काळात या खात्याकडून केवळ शिंदे गटाच्या आमदार आणि नगरसेवकांनाच रसद पुरवली जात असल्याची तक्रार होत होती. या सर्व पार्श्वभूमीवर आता या निधीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अंकुश असणार आहे.
या निर्णयानुसार आता नगर विकास खात्यात मोठा निधी वाटपासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरी नंतर ती फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल. मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतरच निधी वितरित केला जाणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व निधीवर आता भारतीय जनता पक्षाचे देखील अंकुश असणार आहे. त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला आगामी निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्याला जाणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांची चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या आधी देखील जाहीर केले होते. मात्र स्थानिक पातळीवर या निर्णयात काही बदल होऊ शकतात. या सर्व पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
Devendra Fadnavis to keep control over expenditure of Urban Development Department
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला