विशेष प्रतिनिधी
नाशिक : राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यातील मस्साजाेगचे सरपंच संताेष देशमुख प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या रिक्त झालेल्या मंत्रीपदावर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागली आहे. मात्र, मुंडे यांना क्लिन चिट मिळाली तर मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन असे त्यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. Dhananjay Munde
छगन भुजबळ एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, उद्या जर धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली, तर मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठरलं, तर माझी काहीही हरकत नाही. मी या मंत्रिमंडळात पुन्हा आलोय. मला सन्मानाने परत बोलवलं. धनंजय मुंडे सगळ्यातून मुक्त झाले. त्यांची सगळी लाईन क्लिअर झाली, तर मी राजीनामा देईन. मंत्रिपद देताना या गोष्टीची चर्चा झाली होती का? असा प्रश्न विचारला असता छगन भुजबळ म्हणाले,”अशा पद्धतीची चर्चा होवो अथवा न होवो; राजीनाम्याचा निर्णय मीच घेणार.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले, तेव्हा भुजबळांचाही मंत्रिमंडळात समावेश असेल, असे समजले जात होते. पण, त्यांना संधी दिली गेली नाही. नाशिकमधून माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ मंत्री बनले होते. पक्षाकडून मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्याने छगन भुजबळ नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी जाहीरपणे याबद्दलची खदखद व्यक्तही केली होती. याच दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरण घडले. त्यात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर आरोप झाले. आणि धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्यामुळे भुजबळांसाठी मंत्रिमंडळात संधी तयार झाली होती.
Dhananjay Munde gets a clean chit, I will resign as minister, claims Chhagan Bhujbal
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित