विशेष प्रतिनिधी
मुंबई : पालकमंत्री अजित पवार यांचा बीड दौरा आणि सभेतील वक्तव्ये यांचा संदर्भ देत धनंजय मुंडेंचं दहशतीचे राजकारण आता संपलंय, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. Anjali Damania
दमानिया म्हणाल्या, बीडमध्ये पालकमंत्री अजित पवार गेले असताना तिथे धनंजय मुंडे कुठेही दिसले नाही हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा भाषणात अजित पवार म्हणतात की, इथे कोणाचे बड्या बापाचा बेटा असला तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होईल. तिसरा डायलॉग त्यांचा की, आका असो काका असो सगळ्यांवर कारवाई होईल. एकदा माफ केलं जाईल, दोनदा केलं जाईल तिसऱ्या चौथ्यांदा जर झालं तर चौथ्यांदा थेट त्यांच्यावर मकोका घालावा ह्या ज्या सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या.
दमानिया म्हणाल्या, राजाभाऊ मुंडे नावाच्या व्यक्तीला जे अजित पवार गटात घेतलं गेलं याचा अर्थ धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या कुटुंबाचं राजकारण आता संपलं. आता वंजारी समाजाला जवळ ठेवण्यासाठी राजाभाऊ मुंडे ना घेतले गेले, पण या सगळ्या बोलण्यावरून आपल्याला दिसतंय की आता धनंजय मुंडे यांना कुठेही धारा मिळणार नाही आणि म्हणून मी आज सकाळी बघितले. सात वाजल्यापासून बातमी चालतीये की, संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग नाही. ही बातमी आली कुठून ते स्पष्टपणे अजित पवार धनंजय मुंडेंना बाजूला करतात म्हणूनच धनंजय मुंडेनी थेट कार्यकर्त्यांद्वारे ही पेरली आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल बोलताना दमानिया म्हणाल्या की, संतोष देशमुख यांचे जेव्हा फोटो बाहेर आले त्याच्यातली क्रुरता बाहेर आली आणि तो कृतांत करणारा कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा होता म्हणूनच त्यांचा राजीनामा घेतला गेला. वरून दबाव होता की नव्हता त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. जनभावना जी होती ती ही होती आणि त्यासाठी त्यांचा राजीनामा घेतला गेला.
Dhananjay Munde’s politics of terror is over now, Anjali Damania criticizes referring to Ajit Pawar’s statements
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल