हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप

हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप

विशेष प्रतिनिधी

परळी: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या हत्येच्या कटाचा थेट आरोप माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केला हाेता. मात्र, धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन कट प्रकरणी बोलणारे, अटक झालेले, कबुली देणारे सर्व जरांगे यांचे कार्यकर्ते असून या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी केली आहे. Dhananjay Munde

मुंडे म्हणाले, मनोज जरांगे मला टार्गेट करत आहेत कारण मी त्यांना दोन प्रश्न केल म्हणून ते मला टार्गेट करत आहे. त्यांनी जे आरोप केले आहे त्यावर सीबीआय चौकशी व्हावी. माझ्यासह मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करावी, त्यासाठी कोर्टाकडून मी परवानगी काढतो. मुख्यमंत्री, छगन भुजबळ, मी, पंकजाताई यांच्यावर अश्लील भाषेत टीका केली पण आम्ही गप्प राहिलो, कारण आम्हालाही वाटते मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण ओबीसीला धक्का न लावता,
धनंजय मुंडे म्हणाले की, माझा फोन 24 तास सुरू असतो कारण मी सामान्य माणसाला बोलत असतो. मनोज जरांगे तुम्ही जितके खोटे करताल ते तुमच्याही विरोधात फिरेल. Dhananjay Munde

मला टार्गेट करत आहात, तुम्ही मला लाथ मारत बाहेर काढले आहे. जरांगेच्या आंदोलनाच्या काळात 500 लोकांनी आपला जीव दिला हे सर्व मनोज जरांगे यांनी लोकांना फसवले म्हणून झाले आहे. मला संपवून टाकतो हे ऑन एअर धमकी देत असेल तर त्यांचे काय करणार, मुख्यमंत्र्यांना संपवून टाकेल असे म्हटले मग त्यांना कायदा काही का करत नाहीत. सामान्य माणसांना मोठे करण्यासाठी मी काम करत आहे. मराठा समाजाने काही करावे म्हणून त्यांचा आदेश होता का? त्यांचेचे माणसे पाठवून हे सर्व घडवून आणत आहेत. या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी, आणि नार्को टेस्ट करावी. तो पर्यंत मी शांत बसणार नाही. त्यांच्याविरोधात जे बोलले त्यांना मारतात, यांच्यामुळे समाजा-समाजामध्ये अंतर पडले आहे. तुमच्या मेहुण्याचे किती वाळूचे ट्रक पकडले? त्यावर काय कारवाई केली. साधारण माणसाला एमपीडीएमध्ये घालतात, याच्यावर काय कारवाई झाली असा सवाल मुंडेंनी केला आहे. कोणाला संपवण्याचे मला माझ्या आई-वडीलांनी संस्कार दिले नाही.



धनंजय मुंडे म्हणाले की, जात पात पाळायची नाही हे संस्कार माझ्या कुटुंबीयांना मला दिले आहेत. मी आज पर्यत कधीही जात पाहून कुणाचे काम केले नाही. 2002 मध्ये जिल्हा परिषदमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे हा ठराव मी घेतला होता. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली. मराठा आंदोलनासाठी मी अनेक वेळा मदत केली आहे. ते आंदोलन मनोज जरांगे यांचे असो की विनायक मेटे, जावळे, छत्रपती संभाजीमहाराज यांच्या खांद्याला खादा लावत मी काम केले.

धनंजय मुंडे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मी कायम प्रयत्न केले आहेत. नगर जिल्ह्यामध्ये एक बलात्कार झाला होता तेव्हा तिथे कुणीही गेले नाही मी सर्वात पहिले तिथे गेलो सर्व आरोपी अटक होईपर्यंत मी अधिवेशन चालू दिले नाही. ही माझी मराठा समाजाबद्दलची भूमिका आहे. मनोज जरांगे यांचे आणि माझे काही वैर नाही. मी एकदा सोडले तर त्यांच्याविरोधात बोललो नाही. सर्व समाजाला 18 पगड जातींना एकत्र करत असताना याला पूर्ण संपवायचे राजकीय, सामाजिक मी कुठेच नसावा असे मनोज जरांगे यांना वाटते.

धनंजय मुंडे म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीमध्ये जाऊन फायदा आहे का? की EWS मध्ये मराठा समाजाचा फायदा आहे याचे उत्तर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेसमोर द्यावे. ओबीसींना आरक्षणांना धक्का लागणार नाही हे आम्ही बोललो होतो. जाती-जातींमध्ये वाद निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रात जरांगेमुळे वाईट परिस्थिती निर्माण झाले आहे. हे वातावरण आपल्याला सुधारायचे आहे. बीडमध्ये एका लोकप्रतिनिधीला फोन केला तेव्हा ज्यांची ज्यांची घरे जाळली ही प्रवृत्ती कुणाची आहे. कुणालाही संपवण्याची ही प्रवृत्ती कुणाची आहे. मला तलवारीने मारायला आलेल्या लोकांना मी दुसऱ्या दिवशी चहा पाजला आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की, मनोज जरांगे तुमची तयारी कधी आहे की मराठा समाजाला ओबीसीमध्ये जाऊन फायदा आहे का? की EWS मध्ये मराठा समाजाचा फायदा आहे, तुम्ही जागा सांगा. मारामारीची प्रवृत्ती कोणाची आहे, तुम्ही हाकेंना मारले, वाघमारेंना मारले, किती उदाहरणे देऊ. मी कट केला म्हणता अरे परळीची जनता इथे बसलेली आहे, माझ्याकडून त्यांना काय धोका आहे. केवळ ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये म्हणून आमचे वैर आहे. मी सामान्य माणूस आहे. मी कसला कट रचला जातोय अटक झालेला कार्यकर्ते त्यांचे, कबुली देणारे कार्यकर्ते त्यांचे आणि बोलणारेही त्यांचे आणि कट मी केला म्हणतात.

धनंजय मुंडे म्हणाले की, मनोज जरांगे म्हणाले की धन्याचे बीज ठेवायचे नाही ही धमकी नाही का? हे ते ऑन एअर बोलले आहे. वंजारी जातीचे बीज ठेवायचे नाही ही ऑन एअर धमकी दिली. ओबीसीचे सर्व उपटून टाका ही धमकी कुणी दिली? सर्वच अधिकार तुमच्याकडेच आहे. सरकार तुमचेच सर्व काही ऐकत असेल तर सर्व ओबीसी समाजाला संपवून टाका. गोळ्या घाला आम्हाला संपवून टाका. सर्व यंत्रणा जर तुमचे ऐकत असतील आम्हाला संपवून टाका.

Dhananjay Munde’s sensational allegation that the accused in the murder conspiracy are activists of the same party

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023