विशेष प्रतिनिधी
मुंबई : सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवला असेल तर त्यात सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्याने रडण्याचे काय कारण, तो निधी काय त्यांच्या बापाचा होता का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचा सुमारे ४१० कोटी रुपयांचा निधी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्थखात्याने वळवला आहे. यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ते तक्रार करणार आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीच्या आधी ‘लाडकी बहीण’ योजनेचं वचन तुम्हीच दिलं होतं. आता ते पूर्ण करताना जर निधी वळवला जात असेल, तर रडताय का? अजित पवार हे खमके आणि सक्षम अर्थमंत्री आहेत.” महाविकास आघाडीच्या काळात शिवसेनेच्या खात्यांना निधी न दिल्याची ओरड व्हायची, आजही तीच परिस्थिती असून आता मात्र शिंदे गट स्वतः सत्तेत आहे.
राज्याच्या अर्थमंत्रालयाने सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटी ३० लाख रुपये आणि आदिवासी विभागाचा ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळवल्याचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त झालेले शिरसाट म्हणाले, “जर निधीच द्यायचा नसेल, तर ही खातीच बंद करून टाका.या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि अजित पवार यांच्यात सध्या तीव्र शाब्दिक चकमक सुरू आहे.
Did the Social Justice Department’s funds belong to his father? Sanjay Raut’s question
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra