विशेष प्रतिनिधी
सांगली : राज्यातील नशेखोरीविरोधातील मोहिमेला अधिक तीव्र करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगलीत स्पष्ट इशारा दिला आहे की पोलिस दलातील कोणीही अधिकारी किंवा अंमलदार नशेच्या व्यवहारात सहभागी असल्याचे आढळल्यास त्याला केवळ निलंबन नव्हे, तर थेट बडतर्फ करण्यात येईल.
सांगली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी कडेगाव-आटपाडी पोलिस ठाण्याची नवी इमारत आणि २२४ निवासस्थानांच्या पोलीस गृहनिर्माण योजनेचं भूमिपूजन देखील करण्यात आलं. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, धनंजय महाडीक, आमदार जयंत पाटील, सुरेश खाडे, विश्वजित कदम आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अंमली पदार्थ हे देशाच्या भविष्यासाठी घातक असून युवा पिढीला बरबाद करणारे आहेत. त्यामुळे राज्य सरकारने नशाविरोधी धोरणात ‘झीरो टॉलरन्स’ घेतला आहे. सांगली जिल्ह्यातील पोलिसांनी नशाविरोधी कारवायांमध्ये चांगले यश मिळवले असले तरी यामध्ये कोणत्याही पोलिसाचा सहभाग आढळल्यास क्षमा केली जाणार नाही.”
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री म्हणाले, ही आत्महत्या नसून मानसिक छळामुळे घडलेली दुर्दैवी घटना आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई केली असून, तपासाचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला जाईल.एकविसाव्या शतकातही सून-मुलीमध्ये भेदभाव करणे फक्त चुकीचे नव्हे, तर पाप आहे. ही मानसिकता बदलेल, यासाठी समाजाची जबाबदारी आहे. याप्रकरणी मकोका (MCOCA) लागू करण्याच्या शक्यतेवर सुद्धा पोलिस तपासानंतर निर्णय घेतला जाईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या चर्चेवर उत्तर देताना, फडणवीस म्हणाले, “त्यांचा हेतू वेगळा होता, त्यांना पूर्ण माहिती नव्हती. त्यामुळे या मुद्यावरून गैरसमज होऊ नये.”
फडणवीस म्हणाले, “अलमट्टी धरणाच्या पाण्याबाबत महाराष्ट्राची लढाई सुरूच राहील. माझा शब्द आहे की इचलकरंजीला पाणी मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आवश्यकता भासल्यास सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी राज्य सरकारने ठेवली आहे.
“मी ७२ तासांचा मुख्यमंत्री असतानाच कृष्णा नदीच्या पूराचे पाणी वळविण्याच्या जागतिक बँकेच्या प्रकल्पाला मान्यता दिली होती. तो प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून १५ दिवसांत निविदा काढली जाईल, असे सांगून फडणवीस की, “या योजनेअंतर्गत उजनी धरण आणि मराठवाड्याकडे १५० टीएमसी अतिरिक्त पाणी वळवण्याचे नियोजन आहे. ही योजना यशस्वी झाल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना दरवर्षी होणाऱ्या महापुराच्या संकटातून कायमची मुक्तता मिळेल.” CM Devendra Fadnavis
Direct dismissal if police involvement is found in drug abuse case, CM Devendra Fadnavis warns sternly
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित