हनी ट्रॅपच्या प्रकरणाची चर्चा विधानसभेपर्यंत, 72 सनदी अधिकारी, राजकीय नेते तसेच आजी आणि माजी मंत्र्यांचा समावेश असल्याची चर्चा

हनी ट्रॅपच्या प्रकरणाची चर्चा विधानसभेपर्यंत, 72 सनदी अधिकारी, राजकीय नेते तसेच आजी आणि माजी मंत्र्यांचा समावेश असल्याची चर्चा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात गाजत असलेला हनी ट्रॅपच्या प्रकरणाची चर्चा विधानसभेपर्यंत गेली आहे. 72 सनदी अधिकारी, राजकीय नेते तसेच आजी आणि माजी मंत्री देखील ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. या हनीट्रॅपच्या माध्यमातून गोपनीय कागद समाजविघातक संघटनांकडे गेले तर राज्यासह संपूर्ण व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त करत काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी चौकशीची मागणी केली आहे.

विधानसभेत कॉंग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले की, “राज्यात एक अतिशय महत्वपूर्ण बाब पुढे येत आहे. हनीट्रॅपच्या माध्यमातून आपल्या राज्यातले गोपनीय दस्तऐवज काही लोकांना मिळत आहेत. या प्रकरणात राज्यातील वरिष्ठ अधिकारी, आयएएस अधिकारी आणि काही मंत्री यात समाविष्ट आहेत अशी चर्चा सुरू आहे. राज्यातील गोपनीय दस्तऐवज बाहेर जातील असा हनीट्रॅप लावला गेला आहे. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मी ही महत्वपूर्ण बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देणे माझे कर्तव्य समजतो. या हनीट्रॅपच्या माध्यमातून गोपनीय कागद समाजविघातक संघटनांकडे गेले तर राज्यासह संपूर्ण व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.”

मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती

नाना पटोले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून म्हणाले की, या प्रकरणी राज्यात काय सुरू आहे? याची वस्तुस्थिती संध्याकाळपर्यंत सरकारने सभागृहापुढे स्पष्ट करावी. या ठिकाणी आपण आमचे पालक आहेत. तुम्ही ही माहिती सरकारकडून मागवून सभागृहाला कळवली पाहिजे. अध्यक्षांनी शासनाला याची योग्य ती दखल घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्या

राज्यातील तब्बल 72 सनदी अधिकारी, राजकीय नेते तसेच आजी आणि माजी मंत्री देखील ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक, सहायक आयुक्त, पोलिस उपायुक्त, पोलिस उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त अशा दर्जाच्या अधिकार्‍यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी मागणार्‍या महिलेची आता गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केली आहे. नाशिकमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर तपास सुरू करण्यात आला आहे.

Discussion on the Honey Trap case is going on till the Legislative Assembly

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023