Bachchu Kadu “: आमचे आंदोलन मोडीत काढायचे आहे का? मुंबईला भेटीसाठी जाण्यास बच्चू कडू यांचा नकार

Bachchu Kadu “: आमचे आंदोलन मोडीत काढायचे आहे का? मुंबईला भेटीसाठी जाण्यास बच्चू कडू यांचा नकार

Bachchu Kadu

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Bachchu Kadu ” आमचे आंदोलन मोडीत काढायचे आहे का? असा सवाल प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केला आहे. कडू यांनी त्यांच्या मागण्यांच्या बैठकीसाठी मुंबईत यावे, असे बावनकुळे यांनी कडूंसोबत फोनवरून संवाद साधताना म्हटले. पण मुंबईला भेटीसाठी जाण्यास कडू यांनी नकार दिला आहे.Bachchu Kadu ”

शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला घेऊन बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे हैदराबाद महामार्ग आणि तिथून समृद्धीकडे जाणारा महामार्ग बंद झाला आहे.Bachchu Kadu ”

कडू यांनी सरकारला 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला. यावेळी कडू यांनी फोनवरून बावनकुळेंना म्हटले की, तुम्ही सांगा वेळेवर कोणतेच मंत्री यायला तयार नाहीत. त्यामुळे जर का मंगळवारी आम्ही मुंबईला आलो असतो तर आमचा मोर्चा पांगला असता. त्यामुळे हे आंदोलन सोडून आम्ही मुंबईला बैठकीसाठी कसे येऊ शकतो, तुम्ही ही बैठक नागपूरला लावा. नागपूरला मंत्रालय आहे, त्यामुळे इथे बैठक घ्या. कारण इतर ठिकाणी तुम्हाला जाता येते, जातीवादी किंवा इतर मोर्चामध्ये जाता येते, मग शेतकऱ्यांच्या मोर्चात यायला काय झाले?Bachchu Kadu ”



कडू म्हणाले, बावनकुळे तुम्हीच सांगा की लाखो शेतकरी इथे असताना आम्ही तिथे आलो असतो तर आमच्याबाबत काय समजले असते. त्यांनी काय म्हटलं असते? तुम्ही संघटनेत राहणारी लोक आहात. त्यामुळे मोर्चेकरी प्रमुखच बैठकीला गेले असते तर काय संदेश गेला असता. प्रतिनिधी स्वतः का यायला तयार नाही. त्यामुळे माझे काय म्हणणे आहे की, मी मुख्यमंत्री फडणवीसांना सविस्तर मेसेज पाठवला आहे. ज्यामुळे केवळ काही गोष्टीची चर्चा करून त्यासंदर्भातील पत्रक काढायचे आहे. अर्ध्या मागण्यांवर परिपत्रक काढायचे आहे कारण बैठक झाली आहे. मागे जुलै महिन्यात बैठक झाली. तुमच्यासोबत सुद्धा बैठक झाली. तेव्हा पण काहीच झाले नाही. दोन बैठकी आधीच झाल्या आहेत. पण निर्णय कुठे झाले आहेत? अपंगांचे फक्त हजार रुपये वाढवण्यात आले आहेत, असे म्हणत कडूंनी बावनकुळेंवर संताप व्यक्त केला.

हे आंदोलन सोडून मुंबईला कसे येऊ? कारण मुंबईला विमानाने जायला दोन तास, बैठकीसाठी दोन तास, पुन्हा यायला दोन तास म्हणजे मग आमचा पूर्ण दिवस जाईल आणि उद्या जर आंदोलन हातात नाही राहिले तर काय करायचे? बैठक घ्यायला आम्ही तयार आहोत. पण ती इथे नागपूरला घ्या. उद्या शेतकऱ्यांनी काही केले? काही प्रॉब्लम झाला? कोणाला अटक झाली? उद्या वातावरणाचा फरक आला तर आम्ही काय करायचे? त्यामुळे बैठकीच्या नावाखाली तुमचे आमचे आंदोलन मोडीत काढायचे आहे का? असे सवाल बच्चू कडूंनी केले.

Do you want to break our movement? Bachchu Kadu refuses to go to Mumbai for a visit

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023