Gulabrao Patil :‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका

Gulabrao Patil :‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच राजकीय तणाव वाढताना दिसत आहे. मतं मिळवण्यासाठी विकास निधीचे आश्वासन दिल्याच्या आरोपांवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिकमधील अजित पवारांच्या विधानांचा समाचार घेत जोरदार फटकेबाजी केली. दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका, असे सुनावले.



नगरपालिका निवडणुकीत “मत द्या, विकासासाठी मोठा निधी मिळेल” अशा प्रलोभनात्मक प्रचाराचे आरोप अजित पवारांवर केले जात आहेत. अजित पवारांनी बारामती, मराठवाडा आणि अकोल्यातील सभांमध्ये असेच संकेत देणारी भूमिका मांडल्याचा दावा विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सभेत पाटील म्हणाले, आम्ही पाण्याची योजना आणली, ते म्हणतात त्यांची. दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका. मतदारसंघात आम्ही सर्व समाजासाठी कामे केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 350 कोटी रुपये दिले. आमच्याकडे सरळ शिवसेना आहे. तिकडे भाजपचे डोके, राष्ट्रवादीची कंबर आणि मनसेचे पाय असे तीन तुकडे दिसतात,

“ही निवडणूक शहर विकासाची आहे; पण काही जण पैशांच्या जोरावर मतदारांना वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिले बायको नवऱ्याकडे पैसे मागायची. आता नवरा बायकोकडे पैसे मागतो. ही निवडणूक विकासाची आहे. अर्ध्या रात्री रक्त देणारी माणसं आम्ही उभी करतो, ते आता मटण देतील. मटण त्यांचं खा आणि बटण आपलं दाबा. लक्ष्मी 18 तारखेला दारोदार फिरली होती. या निवडणुकीतही काही जण लक्ष्मी पाठवतील. तुम्ही घराबाहेर खाट टाकून झोपा, म्हणे लक्ष्मी पुन्हा येईल, असेही पाटील म्हणाले.

पाटीलांनी अजित पवारांशी झालेल्या भेटीचा उल्लेखही केला. ते म्हणाले, “अजितदादा म्हणाले, भगूरला जाऊ का. मी सांगितले, जा आणि घोषणा करा. पण शहण्यासारखे वागा,” असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या इतिहासाची आठवण करून देताना ते म्हणाले, भुजबळ भाजी विकायचे, नारायण राणे काय करायचे, कोंबड्या विकायचे. बाळासाहेबांनी लहान लोकांना मोठे केले. आता आम्ही सगळ्या उमेदवारांना दणक्यात जिंकवणार आहोत.

“Don’t Call Others’ Children Your Own,” Gulabrao Patil Slams Ajit Pawar in Nashik

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023