विशेष प्रतिनिधी
पुणे : Ravindra Dhangekar उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय असलेले व्यावसायिक समीर पाटील यांच्याविरुद्ध कोणतेही बदनामीकारक विधान किंवा टिप्पणी करू नका अशा शब्दांत दिवाणी न्यायालयाने माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar ) यांना सुनावले आहे. समीर पाटील यांचा अर्ज निकाली निघेपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत समीर पाटील यांच्या विरोधात वक्तव्य करण्याबाबत धंगेकर यांच्यावर न्यायालयाने प्रतिबंध घातला आहे.
दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश (वरिष्ठ स्तर ) के. आर. सिंघेल यांनी हा आदेश दिला आहे.नीलेश घायवळचे आणि चंद्रकांत पाटील यांचे जवळचे संबंध असून, त्यांच्याच पाठबळामुळे घायवळ गँग पुण्यात दहशत माजवत असल्याचा आरोप धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला होता. या प्रकरणात चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या समीर पाटील यांच्यावरही धंगेंकरांनी आरोप केले होते. त्यामुळे, समीर पाटील आणि धंगेकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. त्यामुळे समीर पाटील यांनी धंगेकर यांच्याविरुद्ध कोर्टात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या दाव्यावर सुनावणी होताना धंगेकरांना न्यायालयाने सूचना दिल्या आहेत.
http://youtube.com/post/UgkxbjD5CR7Ti361O1ar0LYMFltWAHV1ObUH?si=hHMX4amF_1wPjHqw
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात बोलताना धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी समीर पाटील यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याचा आणि त्यांचा गुंडांशी साटेलोटे असल्याचा दावा केला होता. यासाठी त्यांनी पुरावे म्हणून काही फोटो आणि माहिती समोर आणली होती. मात्र, या आरोपांचा कोणताही ठोस संदर्भ किंवा पुरावा नसल्याचा दावा करत समीर पाटील यांनी धंगेकरांचे आरोप हे राजकीय स्वार्थापोटी केल्याचे सांगितले होते. तसेच धंगेकर यांच्या या टीकेमुळे समीर पाटील यांच्या व्यवसायिक प्रतिमेला आणि वैयक्तिक आयुष्यात मोठा धक्का बसला असल्याचे त्यांनी सांगितले होते.
Don’t make defamatory statements or comments against Sameer Patil, court reprimands Ravindra Dhangekar
महत्वाच्या बातम्या
- हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप
- Ambadas Danve : मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला…! अंबादास दानवे यांचा अजित पवारांवर निशाणा
- राजद म्हणजे खंडणी, घराणेशाही आणि घोटाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
- स्लीपर वंदे भारत ट्रेन धावली ताशी १८० किमी वेगाने, डेस्कवरचे पाणीही नाही सांडले



















